लाज सोडली, बुलढाण्यात विवाहितेला सासरच्यांनी १२ दिवस अण्णाचा एक खायला दिला नाही, भुकेनी तरमळायची…

बुलढाणा : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे असतानाही अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र समोर आहे.अशातच बुलढाणा जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.सासरच्या लोकांकडुन शारीरिक व मानसिक छळ करून महिलेला तब्बल १२ दिवस उपाशी ठेवण्यात आलं.त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील विवाहितेच्या सासरच्या लोकांवर पिंपळकर राजा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

जळगाव जामोद दुर्गा चौकातील पवन रमेश नवथळे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलयं की,माझी बहीण पुनम हिचा विवाह ५ वर्षांपूर्वी भालेगाव बाजार येथील श्रीकांत प्रकाश भोरे यांच्यासोबत झाला होता.श्रीकांत व त्याचे वडील प्रकाश केशव भोरे(वय ६०),अलका प्रकाश भोरे(वय ५५),ननंद अमृता रोहित गावत्रे(अमरावती) यांनी संगनमत करून माझ्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ केला.

एतकेचं नाही तर तिला १० ते १२ दिवस उपाशी ठेवले.परिणामी तिची प्रकृती खालावली.त्यानंतर तिला अकोला येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान तिना ३ फेब्रुवारी रोजी प्राण सोडले.या तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

एकीकडे आपण प्रगतीच्या दिशेने पावलं टाकत असताना आजही स्त्रियांना लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे.अशा घटना घडल्यावरचं काही काळ कायदे कठोर करण्याची भाषा केली जाते.मात्र त्यानंतर अशा घटना रोखण्यात अपयश येत असल्याची परिस्थिती आहे.बुलढाणा जिल्ह्यातील या ताज्या घटनेनं पुन्हा एकदा महिला अत्याचाराचं कटु वास्तव समाजासमोर आलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *