बेचारा नवरा! बायको जानुसोबत पळुन गेल्याने मुंडण केलं, ढोल वाजवला; म्हणाला,माझी बायको जर…

राजस्थानमधील बाडमेरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची घटना घडली आहे. यावर पीडितेच्या पतीने बाडमेर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या पतीने आधी पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल वाजवला. मात्र त्यानंतरही काम न झाल्याने मुंडण करून घेतले.

आता या नाराज पतीने पोलिसांना पत्नीला परत मिळवून द्या, अन्यथा धर्मांतर करेन असा इशारा दिला आहे. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या सोडून गेल्याच्या दुःखात मुंडण करणाऱ्या व्यक्तीचे नाव गेनाराम असं आहे. तो बाडमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाक गावचा रहिवासी आहे.

गेनाराम सांगतात की, जोधपूरचा एक तरुण त्याच्या पत्नीला घेऊन गेला. नंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने लग्नही केले. तर त्याच्या पत्नीने अद्याप त्याच्यापासून घटस्फोट घेतलेला नाही. अशा परिस्थितीत हिंदू विवाह कायद्यानुसार कोणतीही स्त्री घटस्फोटाशिवाय पुरुष नसलेल्या व्यक्तीशी विवाह करू शकत नाही.

गेनाराम यांच्यावर गिडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप गेनाराम यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गेनाराम यांनी प्रथम ढोल वाजवून पोलीस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाडमेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुंडण केले. पत्नीने दागिनेही नेल्याचा आरोप गेनाराम यांनी केला आहे.

आता पोलिसांनी काही कारवाई केली नाही तर धर्मांतर करू, असे गेनारामचे म्हणणे आहे. गेनारामच्या म्हणण्यानुसार पत्नीला परत मिळवण्यासाठी त्याने मुंडण केले आहे. गेनाराम यांनी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून बाडमेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.जिल्हा पोलीस व प्रशासनाला निवेदन सुपूर्द केले. मात्र तरीही कारवाई झाली नाही. शेवटी थकल्यावर त्याने मुंडण करून घेतले. गेनारामची ही दुःखद कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *