बेचारी ओवी जिवाच्या आकंताने ओरडली, महाबळेक्ष्वरात ७ वर्षाच्या मुलीचा मृत्यूने पसरली शोकांतिका

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट झाला हाेती. या घटनेत लहान मुलांसह सात जण जखमी झाले हाेते. घटनेनंतर मुलांवर सातारा शहरातील एका रुग्णालयात उपचार केले गेले. त्यानंतर गंभीर स्वरुपातील मुलांना पुण्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यापैकी एका सात वर्षाच्या मुलीचा आज मृत्यू झाल्याची बातमी महाबळेश्वरात धडकल्यानंतर शहरात शाेककळा पसरली.

महाबळेश्वर येथील कोळी आळीतील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीत जनरेटरच्या पेट्रोलच्या पाईपला गळती लागली. त्यानंतर जनरेटरने पेट घेतला. यात मोठा स्फोट झाल्याने मिरवणुकीला लागबाेट लागले.या घटनेत देवीच्या मूर्तीजवळ बसलेली सात छोटी मुले गंभीर जखमी झाली. भाजलेली मुले जिवाच्या आंकताने किंचाळत हाेती. या सर्व मुलांवर साता-यात प्राथमिक उपचार करुन त्यातील काहींना पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान गेले कित्येक दिवसांपासून मृत्यूची कडवी झुंज देणारी ओवी (वय सात) हिचा उपचारादरम्यान आज (शनिवार) पुण्यातील एका रुग्णालयात मृत्यू झाला. ओवीच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरात धडकताच शहरातील चाैका चाैकात हळहळ व्यक्त केली जात हाेती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *