बेरोजगाराला शिकवलं, मुलीशी लग्न लावु दिलं.,तोचं जावई नोकरी लागल्यावर आता बदलला, चांगलचं डोक लढवलं दाद्यानी

बिहारमधील भागलपूरमध्ये विचित्र प्रेमाची गोष्ट समोर आली आहे. भागलपूर नाथनगर येथे राहणाऱ्या चंद्रकला देवीचा विवाह गोपाळ कुमार मंडल याच्याशी 2013 मध्ये झाला होता. गोपाळ मंडलची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो पत्नी चंद्रकला देवीसोबत त्याच्या सासरच्या घरात राहू लागला. याच दरम्यान सासरे राधारमन मंडल यांनी जावई गोपाळ मंडल याला स्वतःच्या पैशातून शिकवलं. त्यानंतर गोपाल मंडलला बिहार पोलिसात नोकरी मिळाली.

नोकरी लागताच गोपाळ मंडलने पत्नीला सोडून दिलं आणि सासरच्या घरी येणे बंद केलं. तसेच पुन्हा लग्न करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. पत्नी चंद्रकला देवी यांच्या लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सुरळीत चालले होते, पण त्याच दरम्यान, भटौडिया, भागलपूर येथील रहिवासी असलेल्या दोन मुलांची आई वीणा देवी हिच्यासोबत गोपाल मंडलचे प्रेमप्रकरण सुरू झाले. त्यासंदर्भात गावात पंचायतही झाली. सोबतच स्थानिक पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल मंडलने पत्नी चंद्रकला देवीसोबत राहण्यासाठी होकार दिला, मात्र ड्युटीवर जाण्याच्या बहाण्याने गोपाल मंडल त्याची प्रेयसी वीणा देवी हिला गुपचूप भेटत असे आणि चंद्रकला देवी यांनी विरोध केल्यावर गोपाल मंडल तिला मारहाण करत असे. आता गोपाल मंडल आपली पत्नी चंद्रकला सोडून त्याची प्रेयसी वीणा देवी म्हणजेच दोन मुलांच्या आईशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे, त्यानंतर चंद्रकला न्यायाची याचना करण्यासाठी भागलपूर पोलीस कॅप्टन आनंद कुमार यांच्याकडे पोहोचली.

भागलपूरचे एसएसपी आनंद कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ही बाब समोर आली आहे. चंद्रकला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. एसएसपी आनंद कुमार यांनी सांगितले की, पीडितेला वकिलामार्फत न्यायालयाला माहिती देण्यास सांगितले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. चंद्रकला देवीला पाच वर्षांची मुलगी आहे. पती गोपाळ मंडल सध्या हवालदार म्हणून कार्यरत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *