ब्युटीपार्लरमध्ये घुसून पोलीस हवालदाराने नवरीला घातल्या गोळ्या, म्हणतोय…’ कि ति लग्नासाठी पार्लरमधी गेल्यावर…
मुंगेर : बिहार राज्यातील मुंगेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे लग्नासाठी तयार होण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये गेलेल्या वधूवर एका पोलीस हवालदाराने गोळी मारली. त्यानंतर या हवालदाराने स्वत:ही जीव देण्याचा प्रयत्न केला. या हवालदाराने असे का केले हे देखील स्पष्ट झाले आहे.
कासिम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कस्तूरबा वॉटर चौक येथील जावेद हबीब सलूनमध्ये एक वधू सजण्यासाठी गेली होती. मात्र या वधूला ब्यूटी पार्लरमध्ये गोळी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र तपासात हे सर्व एकतर्फी प्रेमातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी पोलीस हवालदाराला पोलिसांनी कोतवाली ठाणे परिसरातील किला भागातून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ही घटना घडल्यानंतर २२ तासांनंतर या प्रकरणाचा खुलासा केला आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा बिहार पोलिसांचा जवान आहे. हा जवान पाटणा येथील दंगल नियंत्रण पथकात कार्यरत आहे.
पोलिसांनी सांगितले कारण
अमनकुमार गौरव (२५) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो १८ मे रोजी पाटण्याहून येथे आला होता. त्याचे मृत मुलीवर एकतर्पी प्रेम होते. या प्रेमप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार त्याने दोन दिवस तरुणीला भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो भेटू शकला नाही.
त्यानंतर त्याला समजले की या तरुणीचे लग्न ठरलेले असून तिचे आज लग्न आहे आणि ती ब्यूटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली आहे. त्यानंतर संतप्त झालेल्या अमनकुमारने थेट ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन तरुणीला गोळी मारली. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.