भरोसा नाही काय होईल ! हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खाल्ली थेट IAS अन् IPS ची नोकरी
वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अनेक जणांना पदाची हवा डोक्यात जाते आणि सर्वप्रथम आपण माणूस आहोत आणि कायद्याला बांधील आहोत याचा धाक राहत नाही त्यातून आपल्या पदाचा गैरवापर करत कायदा हातात घेण्याचे प्रकार देखील अशा अधिकाऱ्यांकडून केले जातात. राजस्थान येथील दोन अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या असून विशेष म्हणजे दोन्ही व्यक्ती हे आयएएस आणि आयपीएस अधिकारी होते . 12 जून रोजी अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली होती त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.
राजस्थानच्या अजमेर येथील हे प्रकरण असून सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कामगार जीवाच्या भीतीने पळून जात असताना पाठीमागून आलेले अधिकारी त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या अधिकाऱ्यांची आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे .
अजमेर येथील मकराना राज हॉटेल अँड रेस्टॉरंट येथील ही घटना असून आयएएस अधिकारी गिरीधर बेनीवाल आणि आयपीएस अधिकारी सुशील कुमार बिश्नोई यांना निलंबित करण्यात आलेले आहे. 2019 सालीच दोघे सेवेत रुजू झालेले होते. गिरीधर हे अजमेर विकास प्राधिकरणात आयुक्त म्हणून काम करतात तर बिश्नोई हे गंगापूर शहर पोलिसात अधिकारी होते. सदर घटनेमध्ये एक एएसआय आणि एक पोलीस हवालदार यांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे .