भाजी विक्रेत्याच्या बँक अकाउंटमध्ये सापडले १७२ कोटी, पण तपासानाअंती गजबचा प्रकार उघडं

गाजीपुरः गाझीपुरमधुन एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.येथे एका भाजी विक्रेत्याला तब्बल १७२ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यामुळं आयकर विभागाने त्याच्याविरोधात नोटिस जारी केली आहे.विनोद रस्तोगी असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे.बँक खात्यातील रक्कमेबाबत आणि आयकर विभागाच्या नोटिसबाबत त्याला काहीच ठावुक नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.तसंच,कोणीतरी त्याची कागदपत्रे वापरुन बँक अकांऊट उघडल्याचा दावा त्याने केला आहे.

विनोद रस्तोगी याला आयकर विभागाच्या वाराणसी कार्यालयातुन नोटिस पाठवण्यात आली आहे.नोटिशीमध्ये म्हटल्यानुसार,युनियन बँकेत असलेल्या त्यांच्या अकाऊटमध्ये १७२ कोटी इतकी रक्कम आहे.त्यावर त्यांनी अद्याप टॅक्स भरलेला नाहीये,असं त्यात नमुद करण्यात आलं आहे.नोटिस मिळताचं विनोद आयकर विभागाच्या कार्यालयात पोहोचले व तिथुन चौकशी केली असता त्यांना धक्कादायक गोष्टी समजल्या.

आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीत जे बँक अकांउटचा उल्लेख केलेला होता ते त्यांचा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.तसेच या आधी कधीच इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार केला नाहीये,असंही विनोदनी म्हटलं आहे.कोणीतरी त्यांच्या कागदपत्र वापरुन माझ्यानावे बँक खाते खोलले आहे,असा दावा विनोदनी यावेळी केला आहे.

विनोद यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मुळाशी जाऊन खोलवर चौकशी करु,असं आश्वासन अधिकार्यांनी दिलं आहे.२५ फेब्रुवारी रोजी विनोद यांना आयकर विभागाकडुन नोटिस आली होती.यात तुमच्या बँक अकांउटमध्ये इतकी मोठी रक्कम कुठुन आली आणि हा पैसा कसा कमावला? याचा खुलासा करण्यासं सांगितले होते.

नोटिस मिळताच विनोद यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले.तिथे त्यांचे कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.दरम्यान ६ महिन्यांपूर्वी देखील विनोद यांना अशाच प्रकारची एक नोटिस आली असल्याचं उघडं झालयं.सायबर पोलिस आणि आयकर निभाग संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.विनोद यांना काही कागदपत्रे आणायला सांगितली आहे.त्यांना याआधीही अशी नोटिस मिळाली होती.

मात्र,त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केले होते,असं सायबर सेलचे प्रभारी मिनल मिश्रा यांनी म्हटलं आहे.तर,दुसरीकडे गावातील लोकांनी सांगितले कि,या सगळ्या प्रकरणाला घाबरुन विनोद आपल्या घराला कुलुप लावुन कुटुंबासमवेत अज्ञात ठिकाणी निघुन गेले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *