भिवंडीत गरोदर असतांना नवऱ्याच्या मित्रासोबत शारिरीक संबंध, डिलिव्हरी झाल्यानंतर ५ दिवसांनी पुन्हा इच्छा होताचं…

भिवंडी शहरातील भादवड इथं चाळीत राहणा-या एका बाळाला जन्म देणा-या २१ वर्षीय सपना राजकुमार गौतम या विवाहितेची 4 तारखेला हत्या करण्यात आली होती.मित्रानेच अनैतिक संबंधातून मित्राच्या पत्नीची हत्या केल्याचे काबुल केलं आहे.भादवडमधील चाळीत राहणारी सपना आणि पती राजकुमार गौतम हे दोघे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर मोलमजुरीसाठी राजकुमार पत्नीसह मागील दोन वर्षांपासून भिवंडीत राहत होता.

त्यादरम्यान एकत्र काम करणा-या विकास चौरसिया या सोबत ओळख होऊन यात दोघांची मैत्री झाल्याने त्याचे राजकुमार याच्या घरी येणे जाणे सुरू झाले. त्यादरम्यान विकास आणि सपनामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. ती गरोदर असल्याच्या दरम्यान सुध्दा त्यांच्यात शारीरिक संबंध होते.

तीची प्रसूती झाल्यानंतर दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पती राजकुमार कामावर मजुरीसाठी गेला असता सपना हिने विकासला घरी बोलावलं. त्यावेळी विकासने शारीरिक संबंध करण्याबाबत तगादा लावला असता त्यास सपनाने नकार दिल्याने विकास याने घरातील चाकूच्या साहाय्याने तिच्या मानेजवळ खुपसून तिची हत्या केली. त्यानंतर तेथील रक्ताचे डाग पुसून तो फरार झाला.

दरम्यान मुलाच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी राहणा-या महिलेने घरात जाऊन बघितलं असता सपना हि बेशुध्द अवस्थेत असल्याने पती राजकुमार यास बोलावून तिला स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.पण तोपर्यंत सपनाचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरवातीला पत्नीने आजार कंटाळून आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.परंतु त्याबाबत शक्यता पडताळून पाहण्यासाठी मृतदेहाची तपासणी केली असता वैद्यकीय तज्ज्ञांकडून शवविच्छेदन केल्यावर तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झालं.

शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांच्या पथकाने पती राजकुमार यांनी परिसरात कसून चौकशी केली असता विकास चौरासियाचं नाव समोर आलं.त्याचा माग काढीत ताला ताब्यात घेतल्यावर त्याने तपासादरम्यान सपनाची हत्या आपण केल्याचं काबुल केलं.या गुन्ह्याप्रकरणी त्याला भिवंडी नायायालयात हजर केलं गेलं. न्यायालयाने त्यास 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *