‘मम्मी- पप्पा मी आत्महत्या करतेय, कोणालाही…’ भावुक चिठ्ठी लिहुन कोमलनी फास लावला

जळगाव : ‘मम्मी- पप्पा, सॉरी. मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये,’ अशा आशयाची सुसाइड नोट लिहून जळगाव शहरातील रौनक कॉलनीतील उच्चशिक्षित युवतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. सदर तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, पोलिसांनी सुसाइड नोट, लॅपटॉपसह मोबाइल ताब्यात घेतला आहे. कोमल वसंत भावसार (वय ३०) असं मृत तरुणीचे नाव आहे .

जळगाव शहरातील रौनक कॉलनी येथे कोमल कुटुंबीयांसोबत राहत होती. कोमल एका बँकेत नोकरीला होती. कोमलची आई आणि भाऊ गेले पुण्याला आहेत, तर इलेक्ट्रिशियन असलेले वडील शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता कंपनीत कामाला गेले होते. त्यानंतर कोमल ही बँकेत कामावर गेली नाही. ती घरी एकटीच होती. यादरम्यान तिने घरात गळफास घेत जीवन संपवलं.

सायंकाळी वडील घरी आल्यावर, घराचा दरवाजा उघडताच त्यांना मुलगी कोमल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ते पाहून वसंत भावसार यांनी हंबरडा फोडला. वसंत भावसार यांचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि कोमलचा मृतदेह खाली उतरवला.

लॅपटॉपच्या बॅगेत सापडली सुसाइड नोट
घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक अमोल मोरे, अल्ताफ पठाण यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यादरम्यान त्यांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली. ‘पप्पा, मम्मी सॉरी. मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये,’ असं त्यात लिहिण्यात आलं होतं. या चिठ्ठीसह पोलिसांनी कोमलचा मोबाइल व लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण हे करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *