‘मरणाआधी रात्री बाॅयफ्रेंडसोबत मला….बायकोची शेवटची डेंजरस इच्छा ऐकुन पती कोमात

Weird Last Wish : जेव्हाही व्यक्तीची शेवटची वेळ येते, तेव्हा त्यांच्या जवळचे लोक त्यांना त्यांची शेवटची ईच्छा विचारता. सामान्यपणे ही ईच्छा अशी असते जी सहजपणे पूर्ण करता येते. पण कधी कधी काही लोकांच्या अशा ईच्छा असतात की, ऐकूनच हैराण व्हायला होतं. असंच काहीसं एका पतीसोबत झालं. तो पत्नीची शेवटची ईच्छा ऐकून थक्क झाला.

माहितीनुसार, महिलेला डॉक्टरने सांगितलं की, तिला फार गंभीर आजार झाला आहे आणि तिच्याकडे आता केवळ काही महिनेच शिल्लक आहेत. अशात पतीने पत्नीला शेवटची ईच्छा विचारली. पतीकडे पत्नीने अशी ईच्छा सांगितली की, पतीची बोलती बंद झाली. पतीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. काय होती ईच्छा

पतीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या पत्नीला ‘टर्मिनल डिजीज’ झाला आहे. आता ती या जगात केवळ 9 महिनेच राहणार आहे. तो म्हणाला की, त्याला पत्नीला या शेवटच्या दिवसांमध्ये खूप आनंद द्यायचा आहे. पण तिने तिची शेवटची ईच्छा सांगून पतीची झोप उडवली आहे. पत्नी आपल्या पतीला म्हणाली की, तिला मरण्याआधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत रात्र घालवायची आहे. हे एकून पतीला काही सुचणं बंद झालं. आता त्याला काय करावं हे समजत नाही.

पतीने लोकांसमोर आपलं दुःखं जाहीर विचारलं की, त्याच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. नेहमीच त्याला असं जाणवत होतं की, पत्नी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत जुळलेली होती. अशावेळी काय बोलावं हे त्याला माहीत आहे. पण पत्नीची स्थिती बघून तो घाबरलेला आहे. त्याला वाटतं की, शेवटच्या दिवसांमध्ये ती त्याच्यापासून दूर जाईल. या व्यक्ती पोस्ट वाचल्यावर अनेकांनी त्याला सल्ले दिले. एकाने सांगितलं की, कोणत्याही स्थिती त्याने त्याचं मन दुखवण्याचा अधिकार पत्नीला देऊ नये. काही म्हणाले की, आजारी पत्नी चुकत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *