मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका ; बाॅयफ्रेंडच्या घरी दोरीना लावला फास

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या घरातून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपवलं. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी झाली आहे.

ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका. प्रेम करताना जात धर्म बघू नका, अशा प्रकारचा स्टेटस ठेवत कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्याने आपलं जीवन संपवलं असून आत्महत्या केलेला तरुण हा मुस्लिम तर युवती ही हिंदू समाजातील आहे.

आत्महत्या केलेला तरुण १८ वर्षांचा तर युवतीचं वय १६ वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडालीये. हे दोघेही अल्पवयीन एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेम संबंधात घरच्यांकडून विरोध होता.

अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.

हा प्रकार आज सकाळी समोर आला असून यानंतर नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली तर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवून दिले आहे. तर नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *