​मलायका अरोरा अन् अर्जुन कपूर बनणार आई-बाबा..! मलायकाही झाली प्रचंड भावूक

Malaika Arora आणि Arjun Kapoor हे बीटाऊनमधील सर्वात लोकप्रिय आणि ट्रेंडींग कपल्सपैकी एक आहेत. मात्र, त्यांच्या नात्याबाबत त्यांना सुरूवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींपैकी सर्वात प्रमुख आहेत लोकांकडून येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट्स आणि उगाच कारण नसताना केले जाणारे गॉसिप्स!

कधी कधी तर त्यांच्या वयावर देखील विनोद केले जातात, तर कधी अगदी दोघांमध्ये काहीच ठीक नसून दोघे सेपरेट होणार आहेत अशा अफवा उठवल्या जातात.नुकतेच असेच काहीसे घडले जेव्हा एका डिजिटल प्लॅटफॉर्मने चक्क हे कपल लवकरच आई बाबा होणार आहेत अशी गोड बातमी दिली आणि हा तोच क्षण होता जेव्हा अर्जुन आणि मलायका दोघांनाही आपला राग आवरता आला नाही.

त्यांनी सोशल मीडियावर ही अफवा पसरवणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच या एका प्रसंगाने दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांच्या समोर देखील आल्या. पण त्याहीपेक्षा दोघांनाही एकमेकांच्या मनात नेमकं काय आहे त समजलं..! (फोटो सौजन्य :- योगेन शाह, इंस्टाग्राम@arjunkapoor)

अर्जुनचे प्रत्युत्तर
ही बातमी पाहताच अर्जुन कपूरने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर केला आणि ‘आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका’ असा स्पष्ट इशारा दिला. यानंतर बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीतही त्याने या विषयावर आपलं मत मांडलं. यावेळी त्याने थेट नाराजीही व्यक्त केली होती. अर्जुनने म्हटले की, उगाच काहीतरी बनवले आणि त्याची बातमी केली असे मुळात करू नये. आम्ही स्टार्स सुद्धा माणसेच आहोत. तेव्हा त्याने विनंती केली की अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर खोटं छापण्यापेक्षा आधी त्याची सत्यता पडताळून पहावी.

यालाच म्हणतात प्रोटेक्टिव असणे
अर्जुन आपल्या लेडी लव्हबद्दल खूप प्रोटेक्टिव आहे. यामुळेच मलायका प्रेग्नंट असल्याची बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा त्याने आपल्या इमेजची अजिबात काळजी न करता असे करणाऱ्यांना थेट फटकारले. त्‍याच्‍या या कृत्‍यातून स्‍पष्‍टपणे दिसून येते की, जर कोणी त्‍याच्‍या प्रेमलाबदनाम करण्याचा प्रयत्‍न केला तर तो खपवून घेणार नाही.

केवळ प्रेमच नाही तर आदर देखील करतो
अर्जुनने दिलेली प्रतिक्रिया आणखी एक गोष्ट दर्शवते. अर्जुन फक्त त्याच्या मलायकावर प्रेमच करत नाही तर तो तिचा खूप आदरही करतो. नात्यात आदर निर्माण झाला की त्यात कटुता येण्याची शक्यता कमी होते. कारण यामुळे जोडीदाराचा स्वाभिमान आणि भावना दुखावणाऱ्या गोष्टी होत नाहीत.

आहे सपोर्ट सिस्टम
अर्जुन आणि मलाईका हे एकमेकांचे मजबूत सपोर्ट सिस्टीम आहेत. ते उघडपणे एकमेकांनाचीअर करताना दिसतात आणि सर्वांसमोर आपलं प्रेम व्यक्त करायला मागेपुढे पाहत नाहीत. दोघेही नेहमीच कठीण प्रसंगी एकत्र भूमिका घेताना दिसतात. यामुळेच अल्पावधीतच हे जोडपे आयडॉल कपल्सपैकी एक बनले आहे.

टॉक्सिसिटीला जागा नाही
अर्जुन किंवा मलाईका एकमेकांना कधीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार नाहीत. ते रिलेशनशिपमध्ये आहेत परंतु दोघेही आपापल्या कुटुंबासह आणि मित्रांसह क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. अनेकदा असे दिसून येते आहे की मुलगे त्यांच्या GF च्या ड्रेसिंग स्टाईलवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु मलायकाच्या बाबतीत अर्जुन असे कधीच करत नाही. अर्जुन तिला हवं तसं जगण्याचं स्वातंत्र्य देतो, ज्यातून त्यांच्या नात्याची सकारात्मकता स्पष्टपणे दिसते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *