‘मला माझा मित्र बोलवतोय…जावा लागलं’, मित्राच्या मृत्यूनंतर चेतननीही ओढणीने घेतला गळफास

संभाजीनगर : मित्राच्या निधनाचा धक्का बसल्याने तरुणाने आयुष्य संपवलं. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad) ही हृदयाला चटका लावणारी घटना उघडकीस आली आहे. चेतन दिलीप बनस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 28 वर्षांचा होता. जेमतेम आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राने जगाचा निरोप घेतला होता. आजारपणामुळे मित्राचा मृत्यू झाला होता. मात्र जीवलगाचा विरह सहन न झाल्यामुळे चेतनने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन चेतनने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं चेतन वारंवार बोलायचा. अखेर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसल आहे.

काय आहे प्रकरण?
मित्राच्या निधनाने व्याकूळ झालेल्या 28 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपवली. औरंगाबादमधील सातारा परिसरातील संत रोहिदास हौसिंग सोसायटीत ही घटना घडली आहे. मयत चेतन दिलीप बन्सवालने संगणकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले होते.

आठ दिवसांपूर्वी मित्राचे निधन
अवघ्या आठ दिवसांपूर्वी चेतनच्या मित्राचा आजारपणाने मृत्यू झाला होता. मित्राचा विरह चेतनला सहन होत नव्हता. मला माझा मित्र बोलवत आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे, असं तो वारंवार बोलत असे.

पंख्याला गळफास
अखेर, घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन चेतनने आपल्याही आयुष्याचा शेवट केला. एकामागून एक दोन्ही मित्रांनी अखेरचा श्वास घेतल्याने मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतनच्या मित्राच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. आता चेतननेही टोकाचे पाऊल उचलल्यामुळे बन्सवाल कुटुंबावरही आभाळ कोसळलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *