‘मला मामीनचं पळवलंय‘ ,दुप्पट वयाच्या मामीसोबत रासलीला अन् मामीलाचं अडकवायला गेल्यावर…

देशात एक खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशात समोर आलेले असून 45 वर्षांच्या एका महिलेला 24 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जोडणे महागात पडलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला नात्याने त्याची चक्क मामी लागत होती त्यानंतर काही दिवसांनी मामीला भाच्यापासून सुटका करून घेण्याची इच्छा झाली.

मात्र भाच्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. मामीला अडकवण्याचा कट त्याच्याच अंगलट आलेला असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील प्रेमनगर येथील वल्लमपूर भागात हा प्रकार समोर आलेला असून मामीने प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून त्याने आपल्या अपहरणाची खोटी कहाणी रचली होती.

गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने मामीवर बलात्कार करत याचे काही अश्लील फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे. सदर आरोपी हा प्रेमनगर परिसरात राहणारा असून गुरुग्राम येथे खाजगी सुरक्षा रक्षक होता.

काही वर्षांपूर्वी त्याचे त्याच्या मामी सोबत प्रेमसंबंध जुळले. दुप्पट वयाची मामी असताना त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी मामीने त्याच्यापासून सुटका मिळावी म्हणून त्याला टाळण्यास सुरुवात केली मात्र संतप्त झालेल्या या तरुणाने तिला संबंध तोडण्याची धमकी दिली त्यानंतर मामीने प्रेमनगर पोलीस ठाण्यात तिच्या भाच्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

संतप्त झालेला आरोपी याने मामीला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा कट रचला आणि 8 मार्च रोजी तो बेपत्ता झाला. 9 मार्च रोजी त्याने मामीच्या भावाचा फोन चोरला आणि मोबाईलवरून आपण आपल्या नातेवाईकांना आपले अपहरण झालेले आहे असा मेसेज पाठवला. सदर घटनेत त्याने एक लाख रुपयांची खंडणी देखील मागितली. पालकांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तो आढळून आला नाही म्हणून अखेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 17 मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आपल्या अपहरणामागे मामीचा हात आहे असे त्याने म्हटलेले होते . पोलीस अधिकाऱ्यांना देखील अपहरणाचा संदेश आला म्हणून पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवली . तरुणाच्या शोधासाठी एक पथक सतत कार्यरत होते त्यानंतर अखेर हा तरुण ताब्यात आल्यावर सर्व काही प्रकार समोर आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *