महाराष्ट्रात महिलेकडे शरीरसुखाची चारचाकी गाडीत मागणी , राजकीय पदाधिकाऱ्याचे कृत्य
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेले असून एका महिलेला शरीरसुखाची मागणी करत एका राजकीय नेत्याने चार चाकी गाडीत बेदम मारहाण केलेली आहे. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुला चाकूने भोसकून टाकेल अशी देखील धमकी 22 एप्रिल रोजी लक्ष्मी कॉलनी इथे आरोपीने आपल्याला दिली असे महिलेचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जयकिशन कांबळे ( राहणार संघर्ष नगर मुकुंदवाडी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी जय किशन कांबळे याने पीडित महिलेला फोन करून भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. तिथे आल्यानंतर आरोपीने तिला त्याच्या कारमध्ये बसण्यास सांगितले आणि कारमध्ये बसल्यानंतर त्याने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव असे म्हटले. तू माझ्यासोबत चल..तुला काय पाहिजे आहे ते सांग..माझ्यासोबत मात्र जर तू आली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही , अशी देखील त्याने धमकी दिली आणि महिलेला घेऊन डी मार्ट इथे गेला.
डी मार्ट मध्ये गेल्यानंतर महिलेला बाहेर येण्यासाठी उशीर झाला म्हणून आरोपी संतापला आणि त्याने तिला गाडीमध्ये बसल्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. गाडीतच त्याने तिला चापटीने मारले त्यामुळे तिच्या दोन्ही डोळ्यांना मार लागलेला असून महिलेने त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. छावणी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
आरोपी जयकिशन कांबळे हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. एका राष्ट्रीय पक्षाशी तो संबंधित असून काही दिवसांपूर्वी त्याच्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिलेला त्याने लग्नाचे तसेच घर घेऊन देण्याचे आमिष त्याने दाखवले आणि तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिच्या पोटात लाथा मारून गर्भपात देखील केला असे देखील अनेक धक्कादायक आरोप महिलेने त्याच्यावर केलेले आहेत.