महिन्यावर लग्न अन् घरी आली मुलाची बाॅडी, रायगडमध्ये २८ वर्षीय तरुणाचा भयंकर शेवट

रायगड : नेरुळ सिग्नलपासुन पुढे काही अंतरावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे.घरी आईसोबत झालेला त्याचा कॉल शेवटचा ठरला.कारण भर रस्त्यात निर्भयला भरधाव कारने उडवल्यामुळे त्याचा अंत झाला.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुढच्याच महिन्यात तो गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार होता,मात्र त्याआधीच नियतीने त्याच्यावर घाला घातला.

निर्भय पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.तो पनवेलमधील करंजाडेमध्ये परिसरातील राहणारा होता.आपली दुचाकी घेऊन निर्भय पाम बीच मार्गे वाशीकडे येत होता.

मध्येच आईचा फोन आल्याने नेरूळ सिग्नलपासुन पुढे काही अंतरावर त्याने आपली दुचाकी थांबवली आणि तो आई सोबत फोनवर बोलत होता.मात्र हाच फोन निर्भयचा शेवटचा कॉल ठरला.या मार्गावर येणाऱ्या एका भरधाव कारने निर्भयला जबरदस्त धडक दिली आणि तो गाडीवरून दुर उडून जबर जखमी झाला.हि धडक इतकी भीषण होती की,निर्भय कारवर आदळुन दुभाजकाला धडक देत झाडीमध्ये फेकला गेला.

खेदाची बाब म्हणजे निर्भय पुढच्याच महिन्यात आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार होता.या वृत्ताने पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाला असुन परिसरात शोक व्यक्त होतोय.

या प्रकरणी बेफाम कार चालक राज साळुंखे याच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.निर्भय आपली MH.46.CB.1464 दुचाकी घेऊन नेरूळला मामाकडे गेला होता.तेथुन तो आपल्या बहिणीकडे पाम बीच मार्गे वाशीकडे येत होता.

नेरूळ सिग्नलजवळ सीबीडीकडुन वाशीकडे जाणारा कार चालक साळुंखे याने बेफाम कार पळवत असताना समोरील रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार डावीकडे दाबली.यावेळी कार रस्त्याबाहेर जाऊन सुरक्षा कठड्याला आदळुन फोनवर बोलत उभे असलेल्या निर्भयलाही धडकली.या धडकेत निर्भयचा जागीचं मृत्यू झाला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *