महिला झोपलेली, टीसी आला अन् तिच्या डोक्यावर लघवी केली, पतीसमोर टीसीचं लाजीरवाणं कृत्य

लखनऊ: अमृतसर येथून कोलकाताला जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये रविवारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. या गाडीत रेल्वे टीसीने एका महिलेच्या डोक्यावर लघवी केली. या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली, तेव्हा तिच्या पतीने टीसीला पकडलं आणि सोमवारी सकाळी त्याला चारबाग जीआरपीच्या हवाले केलं.

जीआरपीने टीसीला अचक करत त्याची थेट तुरुंगात रवानगी केली. जेव्हा टीसी ने हे लाजीरवाणं कृत्य केलं तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. ट्रेन नाहीच तर विमानातही लोक अशा प्रकारची संतापजनक कृत्य करताना पाहायला मिळत आहेत.

चारबाग जीआरपी इन्स्पेक्टर नवरत्न गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर येथे राहणारे राजेश हे त्यांच्या पत्नीसोबत अकाल तख्त एक्स्प्रेसच्या A-1 बोगीतून प्रवास करत होते. रात्रीचे १२ वाजले होते. त्यांची पत्नी ही तिच्या सीटवर झोपलेली होती. तेव्हा बिहारचे टीसी मुन्ना कुमार यांनी त्यांच्या डोक्यावर लघवी केली. यानंतर महिलेने आरडाओरड केली. ते ऐकून तिचा पती आणि इतर यात्री जागे झाले आणि त्यांनी टीसीला पकडलं. त्यानंतर जमावाने या टीसीला चांगलंच बदडलं. उपस्थित प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी टीसी नशेत होता. सध्या राजेश यांच्या तक्रारीवरुन मुन्ना यांना अटक करुन त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

विमानातही घडताहेत अशा प्रकारच्या घटना
रेल्वेतच नाही तर विमानातही अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. नुकतंच दिल्ली येथून न्यूयॉर्कला जाणाऱ्या अमेरिअक एअरलाइन्समध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने बाजूला बसलेल्या सहप्रवाशावर लघवी केली. त्यानंतर IGI विमानतळावर या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं.

तर एअर इंडियाचं विमान हे न्यूयॉर्क येथून दिल्लीला येत असताना त्यामध्येही अशाच प्रकारची घटना घडली. जानेवारी महिन्यात झालेल्या या घटनेने अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय शंकर मिश्राने एका वृद्ध महिलेवर लघवी केली होती. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आलं असून ४ महिन्यापर्यंत विमानप्रवासावर निर्बंध लावण्यात आले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *