महिला बस कंडक्टर एका धक्क्यांने झाली मालामाल, चक्क ७५ कोटी गेली घरी घेऊन

‘लाथ मारील तिथुन पाणी काढेन’ ही म्हण तुम्ही नक्कीचं ऐकली असेल.पण सध्याच्या काळात ‘हाथ मारेन तिथे पैसे काढेन’ हि वापरायला हवी.खरचं,अशीच एक चक्रावुन टाकणारी घटना समोर आली आहे.

एका महिलेला मागुन कोणीतरी धक्का मारला.अन् या धक्क्यामुळे ती मालामाल झाली.तिला तब्बल ७५ कोटी रुपयांची लॉटरी लागली.या धक्क्यामुळे तिच्या हातुन चुकीचं बटण दाबलं गेलं अन् चक्क त्याच बटणावर तिला करोडोंची लॉटरी लागली.एका धक्क्यामुळे हि रोडपती महिला करोडपती झाली.

कशी लागली लॉटरी?
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमध्ये राहणारी नमिता बन्सल असं लाॅटरी जिंकणार्या महिलेचं नाव आहे.ति बस कंडक्टर म्हणुन काम करते.ती शॉपिंग करण्यासाठी एका मॉलमध्ये गेली होती.त्यावेळी एका लॉटरीचं वेडिंग मशिन दिसलं.या मशीनमध्ये अनेक प्रकारचे गेम्स असतात.तुम्ही आपला आवडता गेम जिंकलात की तुम्हाला १ लॉटरीचं तिकिट मिळतं.हे तिकिट मग तुम्ही स्क्रॅच करुन आपलं नशीब आजमावुन पाहू शकता.

नमिता देखील आपलं नशीब आजमवण्याची तयारी करत होती.कोणता गेम खेळल्यानंतर पैसा कमावता येईल याचा विचार ति करत होती.तेवढ्यात मागुन कोणीतरी तिला धक्का मारला.अन् ती थेट मशीनच्या किपॅडवर येऊन पडली.दरम्यान तिच्या हातुन भलतंच कुठलंतरी बटण दाबलं गेलं.

काय करणार इतक्या पैशांचं?
नमिताला व्हिडीओ गेम्स खेळायला आवडतात.त्यामुळे तिने मनात नसताना देखील तो video game पुर्ण खेळला.गेम संपल्यानंतर तिला १ लॉटरीचं तिकिट मिळालं.अन् या तिकिटावर तिला थेट ७५ कोटी रुपयांची लॉटरी लागली.

नमिता लॉटरीचं तिकिट घेऊन घरी जात होती तेवढ्यात तिला एक मेसेज आला.या मेसेजमध्ये बंगाल लॉटरी कंपनीची एक लिंक होती.जेव्हा तिने त्यात आपल्या लॉटरीचा नंबर टाकला तेव्हा तिला चक्क ७५ कोटी रुपयांची लॉटरी लागण्याचं समजलं.हा मेसेज पाहुन तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *