महिला वेटरचं ड्रिंकमध्ये स्वत:चं रक्त मिसळून ग्राहकांना पाजायची, कारण कळताचं पोलिसही पोट धरुन हसले
दिल्ली : जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत, जिथं ग्राहकांना विचित्र गोष्टी खायला दिल्या जातात. काही ठिकाणी लोकांना जिवंत कीटकं आणि प्राणीही खायला दिल्याचं आपण पाहिलं असेल. पण आता एक अशी घटना समोर आली आहे जिथे वेटर महिलेने ग्राहकांना स्वत:चं रक्त प्यायला दिलं. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही गोष्ट खूप विचित्र असली तरी ती खरी आहे. ही घटना दिल्लीच्या विहार भागात घडली असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, Mondaiji Con Cafe असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. खरंतर हा एक कॅफे आहे जिथे लोक ड्रिंक करण्यासाठी येत असतात. या रेस्टॉरंटमध्ये शहरातल्या मूक-बधिर आणि मतिमंद लोकांना काम देण्यात आलं आहे. प्रसिद्धी वाढवण्यासाठी या कॅफेमध्ये मुलींना अतिशय भीतीदायक आणि डार्क कपडे घालून वेटरचं काम दिलं जातं.
त्यातल्या एका मुलीने मात्र यातून कहरच केला. तिने ग्राहकांना चक्क पेयातून स्वत:चे रक्त मिसळून दिले. ती स्वत:ला व्हॅम्पायर समजत होती, अशीही माहिती समोर आली आहे.अधिक माहितीनुसार, या घटनेचा खुलासा झाल्यानंतर या कॅफेतून तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आलं. तिची मानसिकता ठीक नसल्याने तिने हे केल्याचं तपासात समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.