महिलेचा गळा पकडून कारसोबत फरफटत नेले आणि… नराधमांचे धक्कादायक कृत्य

Bengaluru Crime News : तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिलेचा गळा पकडून कारसोबत फरफटत नेल्याचे दिसत आहे. या घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीच्या उद्देशांने आरोपींनी या महिलेला कारसह ओढत नेल्याचे दिसत आहे.

अभिषेक आणि शक्तीवेल अशी अटक आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. यांच्याकडून मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कौशल्या असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार
अत्यंत धक्कादायक असे हे CCTV फुटेज आहे. या व्हिडिओमध्ये कौशल्या या रस्त्याने जात आहेत. यावेळी कार मधून जाणारे नराधम कौशल्या यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करतात. सोनसाखळीसह हे नराधन कौशल्या यांच्या गळा पकडतात. धावत्या कारसह ते कौशल्या यांचा गळा पकडून त्यांना कारसोबत फरफटत नेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही अंतरावर गेल्यावर चोरट्यांची कौशल्या यांच्या गळ्याभोवतीची पकड सुटते आणि त्या जमीनीवर पडतात. चोरट्यांनी कौशल्या यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून भरधाव वेगात कार पळवल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

असे सापडले आरोपी
या घटनेमुळे कौशल्या खूपच भयभित झाल्या होत्या. त्यांनी स्वत:ला सावरत थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत तात्काळ तपास सुरु केला. घटनास्थळावरील CCTV कॅमेरे चेक करुन पोलिसांनी कारचा नंबर मिळवला. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

दोन वाहतूक पोलीसांनी एका व्यक्तीला फरफटत नेले
दिल्लीमधला एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दृष्यांमध्ये दोन एका व्यक्तीला फरफटत नेत होते. यातल्या एका पोलिसानं त्या माणसाचा हात पकडलाय तर दुसऱ्यानं त्याचा पट्टा पकडून त्याला तब्बल 50 फूट खेचत नेले. दिल्लीचे पोलीस प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी ही घटना घडल्याला दुजोरा दिला. हा माणूस आणि त्याची बायको हेल्मेटशिवाय बाईकवरून जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवलं. मात्र त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात त्याचा तोल गेला. पोलीस त्याला उचलायला गेल्यानंतर त्यानंच पोलिसांवर हल्ला केला आणि पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहतूक पोलीस त्याच्या मागे गेले आणि त्याला पडकल्याचा दावा पाठक यांनी केला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *