महिलेने लावलं टोमॅटोचं झाड, सकाळी उठुन पाहताच टोमॅटोऐवजी दिसले कंडोम; सत्य कळताच लई वैतागली
अहमदाबाद : मार्केटमध्ये अनेक हायब्रीड झाडं आली आहेत. ही झाडं अशा पद्धतीने असतात की त्यांना अगदी कमी वेळेतच फळं-फूलं येण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसांआधी एक आंब्याचं झाड चर्चेत आलं होतं, ज्यामध्ये आंब्याच्या अनेक जाती एकत्र वाढत होत्या. पण गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका महिलेने लावल्या टोमॅटोच्या रोपामध्ये चक्क भाज्यांऐवजी कंडोम आलं आहे. या झाडाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू असून याचं सत्य वाचल्यानंचर तुम्हीही खूप हसाल.
महिलेने जेव्हा तिच्या झाडाला आंब्याऐवजी कंडोम आल्याचं पाहिलं. तेव्हा तिलाही मोठा धक्का बसला. पण याची चौकशी केली असता अजब सत्य समोर आलं. खरंतर, झाडांवर कंडोम सापडण्याची कहाणी वेगळीच आहे. हे कंडोम काही झाडाला उगवले नाहीत. तर याला जबाबदार त्यांचा शेजारी आहे.
होय, घराच्या वर राहणाऱ्या त्यांच्या शेजाऱ्याने बाल्कनीतून वापरलेलं कंडोम खाली फेकलं आणि ते टोमॅटोच्या रोपावर येऊन अडकलं. त्यामुळे महिलेने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिला विचित्र वाटलं. पण शेजाऱ्यांशी चर्चा केली असता खरं कारण समोर आलं. महिलेने ही घटना फोटोसह सोशल माध्यमावर शेअर केली असून ती तुफान व्हायरल झाली आहे.
महिलेने ही घटना सोशल मीडियावर शेअर करताना एक मेसेजही दिला आहे. यामध्ये तिने तिच्या शेजाऱ्यांना हा इशाराच दिला आहे. ‘अशा प्रकारे वापरलेले कंडोम कधीही फेकून देऊ नये. ते कशामध्ये तरी गुंडाळून त्याला डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. ही एक लाजिरवाणी गोष्ट असून अतिशय अस्वच्छ प्रकार आहे’ असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे.