‘ माझं लय प्रेम आहे तुझ्यावर ‘, अर्चनाच्या भयंकर मृत्यूनंतर प्रभाकरनीही रात्री संपवली जीवनयात्रा

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास भयानक घटना घडली. बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीची तिच्या कथित प्रियकराने भरदिवसा कोयत्याने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली. (Latest Marathi News)

मात्र, शुक्रवारी रात्रीच या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अर्चना उदार (वय १८ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर प्रभाकर वाघेरे (वय २२ वर्ष) असं मृत आरोपी तरुणाचं नाव आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून प्रभाकरने अर्चनाची हत्या करत स्वत:ही आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना ही रयत शिक्षण संस्थेच्या गभालपाडा अनुदानित आश्रम शाळेत बारावीचे शिक्षण घेत होती. आरोपी प्रभाकर याचे अर्चनावर एकतर्फी प्रेम होते. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, असं म्हणत आरोपी प्रभाकर हा अर्चनाला त्रास देत होता.

पण अर्चनाने प्रभाकरला स्पष्ट नकार दिला होता. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता अर्चना नेहमीप्रमाणे काँलेजला निघाली असता, आरोपी प्रभाकर याने तिचा पाठलाग केला. माझ्या प्रेमाचा स्वीकार का करत नाही, असं म्हणत प्रभाकरने रागाच्या भरात अर्चनाच्या मानेवर कोयत्याने वार केले.

या घटनेत अर्चनाला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी प्रभाकर हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधात पथके रवाना केली होती. मात्र, पोलिसांच्या तावडीत सापडण्याआधीच प्रभाकर याने गळफास घेत आपली जीवयात्रा संपवली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *