माझी लेक हरवलीय ओ! आईचा आर्त आक्रोश; पोलिसांनी CCTV फुटेज पाहिलं; बॉडी, बादली अन् बाई दिसली

चंदिगढ: गावातून अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह गावापासून काही अंतरावर सापडला आहे. मुलीची हत्या तिच्या सावत्र आईनं केली होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. आरोपी महिलेचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात ती मुलीला एका बादलीत टाकून नेताना दिसत आहे.

सात वर्षांची अभिरोजप्रीत कौर सोमवारपासून बेपत्ता होती. तिच्या सावत्र आईनं वॉशिंग मशीनमध्ये टाकून तिची हत्या केली. त्यानंतर अभिरोजप्रीत बेपत्ता झाल्याचं नाटक सुरू केलं. अभिरोजप्रीत ट्युशनवरून परतली नसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बेपत्ता मुलीचे वडील अजित सिंह पेशानं मेस्त्री असून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली.

अजित सिंह यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती आहे. अभिरोजप्रीत ही अजित सिंह यांना पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून ती ज्योतीसोबत राहायची. अभिरोजप्रीत सोमवारी ट्यूशनला पोहोचलीच नव्हती, अशी माहिती तपासातून उघड झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी अपहरणाची शंका बोलून दाखवली. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांना मुलीची सावत्र आई ज्योतीवर संशय आला. त्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिनं हत्येची कबुली दिली. अवैध संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्योतीच्या एका बहिणीचे तरुणासोबत अवैध प्रेमसंबंध होते. त्यांना अभिरोजप्रीत कौरनं पाहिलं. त्यामुळे ज्योती आणि तिच्या बहिणीनं मिळून अभिरोजप्रीतनं तिला संपवलं असावं असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सावत्र आईसोबत तिच्या बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *