माझ्याकडे लई प्रॉपर्टी आहे, नवरा दे सोडून अन् मला.., ‘ फोन पे ‘ ने झाली सुरुवात अन् संभाजीनगरमध्ये…

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला असून एका ज्वेलरीच्या दुकानाचे पेमेंट करताना एका महिलेकडून चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पेमेंट गेले त्यानंतर या ज्वेलरी मालकाने संबंधित पीडित महिलेला त्या माणसाकडून पैसे काढून देण्यासाठी तिसऱ्याच व्यक्तीचा नंबर देण्यात आला आणि या तिसऱ्या व्यक्तीने ‘ तिला माझ्याकडे भरपूर पैसे आहेत नवरा सोडून माझ्याशी लग्न कर ‘ असे म्हणत तिच्यासोबत अश्लील संभाषण करत तिचा विनयभंग केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, योगेश पाटील ( राहणार चाळीसगाव ) असे आरोपीचे नाव असून छत्रपती संभाजी नगर येथील एका 32 वर्षे विवाहितेला एका ज्वेलरी दुकानदाराचे सात हजार रुपये पाठवायचे होते मात्र चुकून तिच्याकडून ते पैसे त्रयस्थ व्यक्तीला गेले त्यानंतर हे पैसे बाबू ननवरे नावाच्या एका व्यक्तीच्या खात्यावर गेलेले होते. ज्वेलरी दुकानदाराला हा प्रकार सांगितल्यानंतर त्याने चाळीसगाव येथील योगेश पाटील नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला आणि हा व्यक्ती तुमचे पैसे काढून देऊ शकतो असे त्यांना सांगितले.

32 वर्षीय विवाहितेचा नंबर मिळाल्यानंतर आरोपी योगेश पाटील याने तिच्यासोबत अश्लील बोलणे सुरू केले. तिला अनेकदा व्हाट्सअप कॉल देखील केले त्यानंतर त्याने पीडित महिलेला ‘ माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे बायको आणि मुलांना सोडून दे आणि माझ्यासोबत लग्न कर ‘ असे देखील तो अनेकदा म्हणाला त्यानंतर त्याच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *