माझ्या नवर्यांवर नजर टाकती काय? भर गावासमोर पतीच्या प्रियसीचे बायकोनी कापले केस, लोक मजा पाहत होते

गुजरातच्या (Gujarat Crime News) सूरतमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने पूर्ण गावासमोर एका तरूणीचे केस कापले. महिलेला संशय होता की तरूणीचे तिच्या पतीसोबत अनैतिक संबंध (Girl hair cut on suspicion of illicit relationship) आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तरूणीला काही महिलांनी पकडलं आहे आणि एक महिला तिच्या केसांवर जबरदस्ती कात्री चालवत आहे. पीडित तरूणी ओरडून मदतीची मागणी करत आहे. पण कुणीही तिच्या मदतीसाठी समोर येत नाही.व्हायरल झालेला व्हिडीओ सूरतच्या पलसाना तहसीलच्या तातीथईया गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे एका महिलेने एका तरूणीचे जबरदस्ती केस कापले.

यादरम्यान तरूणी स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत होती. पण काही महिलांनी तिला पकडून ठेवलं होतं. त्यामुळे ती काहीच करू शकली नाही. तरूणीला वाचवण्याऐवजी लोक तिचा व्हिडीओ काढत राहिले. तर काही लोक जोरजोरात हसत होते. पोलिसांनी पीडित तरूणीच्या जबाबानंतर तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेसहीत इतर काही लोकांना अटक केली आहे. ज्यात दोन पुरूषांचा समावेश आहे. सूरतच्या एसपी ग्रामीण उषा राडा म्हणाल्या की, महिलेला संशय होता की, तरूणीचं तिच्या पतीसोबत अफेअर आहे. याच संशयामुळे महिलेने तरूणीला पकडलं आणि तिचे केस कापले.

तरूणीचे केस कापणाऱ्या मुख्य आरोपी महिलेचं नाव सेकन्ति आहे. सेकन्तिसोबत गौरी आणि इतर दोन महिला यात सामिल होत्या. असं सांगितलं गेलं आहे की, सेकन्तिला संशय होता की, तरूणी तिच्या पतीसोबत अफेअर आहे. ज्यावरून महिलेचं तरूणीसोबत याआधीही भांडण झालं होतं. भांडणानंतर तरूणी मध्य प्रदेशमध्ये आपल्या घरी गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती कडोदरा येथे परत आली होती. ज्याची खबर महिलेला लागली. तेव्हा तिने हे कृत्य केलं.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *