माॅर्निंग वाॅकचं कारण देत पाटील दाम्पत्य बाहेर पडले अन् सोबतचं दोघांनी विहिरीत उडी घेतली

जळगाव : मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात राहणाऱ्या पाटील दाम्पत्याने कॉलेजसमोर असलेल्या घराच्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका शेतात आज (बुधवारी) सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. 61 वर्षीय भागवत उर्फ बाळू दिगंबर पाटील आणि 54 वर्षीय विमलबाई भागवत पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.भागवत पाटील आणि विमलबाई पाटील हे यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी होते. ते बुधवारी सकाळी पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

पाटील दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास निर्मल चोपडे यांच्या शेतात गेलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला. त्याने फैजपूर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही लोकांना त्याबाबत सांगितले. नंतर यावल पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर पाटील कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. घाबरलेल्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेतली. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

घटनास्थळी शहरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने जमाव जमला होता. काही वेळानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात ते विच्छेदनासाठी नेण्यात आले.दरम्यान, भागवत पाटील आणि विमलबाई पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. परंतु पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *