माॅर्निंग वाॅकला गेलेल्या नेहानी सेल्फी😥काढुन दिलीपला पाठवला मग कालव्यात उडी मारुन जीव दिला

मध्य प्रदेशच्या रीवामधून आत्महत्येची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आधी प्रियकराला सेल्फी पाठवला आणि त्यानंतर कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. आता पोलिसांसाठी प्रियकराची चौकशी केली जात आहे.

राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी नेहा पटेल ही २२ वर्षीय तरूणी घरातून निघाली होती. मात्र, बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येआधी तरूणीने प्रियकर दिलीप तिवारी या व्हॉट्सअॅपवर सेल्फी पाठवला होता. तो सेल्फी कालव्याजवळचा होता. त्यामुळे प्रियकराला संशय आला. त्याने लगेच याची माहिती तरूणीच्या कुटुंबीयांना दिली.

तरूणीच्या कुटुंबीयांनी हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सिलपरा कालव्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. बराच वेळ शोधाशोध केल्यावर तरूणीचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. पोलीस अधिकारी जगदीश ठाकूर यांनी सांगितले की, मृत तरूणी आणि दिलीप तिवारी दोघेही एका सोनोग्राफी सेंटरमध्ये सोबत काम करत होते. काही दिवसांपूर्वीच दिलीपला सेंटरमधून काढून टाकण्यात आलं होतं.

पोलीस दोघांमधील नात्याची आणि कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी करत आहे. तरूणीच्या कुटुंबीयांनी दिलीप तिवारीवर मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनाही संशय आहे की, काहीतरी गडबड आहे. तरूणीने शेवटी तरूणाला फोन का केला होता? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *