‘मित्रांना खुश कर‘, प्रमोशनसाठी बायकोला बाॅसकड पाठवायचा अन् वैतागुन बुधवारी पत्नीने…

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून एका व्यक्तीने चक्क त्याच्या पत्नीचा वापर प्रमोशन मिळवणे आणि आपल्या बॉसला खुश करण्यासाठी केला असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आपल्याला प्रमोशन मिळावे म्हणून आणि जास्त पैसे मिळावे म्हणून तो त्याच्या पत्नीला इतरांकडे पाठवत होता. तिने नाकार दिल्यानंतर तो तिला मारहाण करायचा असेही महिलेचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, इंदूर येथील जिल्हा न्यायालयात या महिलेने याचिका दाखल करून पतीसोबत इतर लोकांवर गंभीर आरोप केलेले आहे. त्यामध्ये आपला पती हा आपली अदलाबदली करत असायचा तसेच पैसे मिळवण्यासाठी तो मित्र आणि इतर लोकांसोबत आपल्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा असा देखील आरोप तिने केलेला आहे.

संपूर्ण चौकशी केल्यानंतर अखेर न्यायालयाने महिलेच्या पतीसोबत इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.पीडित महिला ही मूळची इंदोरच्या नंदननगर येथील रहिवासी असून तिचे लग्न पुण्यातील एका व्यक्तीसोबत झालेले होते. आरोपी व्यक्ती याची चुकीच्या लोकांसोबत मैत्री होती आणि त्यातील काही मित्र हे त्याचे वरिष्ठ अधिकारी होते त्यामुळे त्यांच्या मदतीने त्यांना खुश केल्यानंतर आपल्याला प्रमोशन मिळू शकते असे त्याला वाटायचेम्हणून तो हा प्रकार करत होता असे महिलेचे म्हणणे आहे.

आरोपी हा तिला तिचा त्याचा बॉस आणि त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा असे म्हटलेले असून अखेर तिने विरोध केल्यानंतर तिला मारहाण देखील करण्यात आली.सदर महिलेला बारा वर्षांची मुलगी असल्याकारणाने संसार टिकावा म्हणून तिने गप्प राहणे पसंत केले मात्र अखेर बुधवारी हाताची नस कापून आत्महत्येचा देखील तिने प्रयत्न केला मात्र त्यानंतर ती 12 ऑगस्ट 2022 रोजी तिच्या माहेरी निघून गेलेली होती.

पतीने त्यानंतर माफी मागितली मात्र पीडित महिलेने न्यायालयात याचिका दाखल केलेली असून पती आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आपल्या जीविताला धोका आहे असे सांगत संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. महिला आणि बालविकास विभागाने देखील या महिलेसोबत अत्याचार झाल्याचे मान्य केलेले असून कार्पोरेट वर्ल्डमधील धक्कादायक सत्य या घटनेनंतर समोर आलेले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *