‘मित्रा तुला शेवटचा धन्यवाद’, जळगावात नव्या दोरीना😥पतीना स्वयंपाक घरात घेतला गळफास
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगावातील अयोध्या नगर परिसरातील नवरात्रोत्सवच्या दांडिया कार्यक्रमात मुलांना चॉकलेट वाटप करुन घरी आल्यानंतर तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता समोर आली आहे. विशाल तुकाराम चौधरी (वय२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अयोध्या नगरातील विशाल चौधरी हा तरुण खासगी कंपनीत कामाला होता. काल शुक्रवारी (दि.२०) रात्री ८ ते १० वाजे दरम्यान परिसरातील नवरात्रौत्सवाच्या दांडिया कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. यावेळी त्याने सर्वांना चॉकलेट वाटल्या. त्यानंतर ‘मला शेवटचे घरी सोडून द्या’, असे मित्रांना सांगितले.
त्यावेळी एका मित्राने त्याला दुचाकीने घरी सोडले. त्यालादेखील ‘शेवटचे धन्यवाद’ असे म्हणून घरात निघून गेला. घरात गेल्यानंतर नव्या दोरीने स्वंयपाक घरात दोरीने गळफास घेतला.पत्नी हर्षाली घरी आल्यानंतर त्यांना पतीने गळफास घेतल्याचे दिसले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीला पाहताच त्यांना धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी धाव घेवून तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. मृत विशाल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी एैशिका असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.