‘मिस यु किंग’ ,मध्यरात्री स्वत:च्याचं श्रध्दांजलीचा स्टेट्स ठेऊन सांगलीत योगेशनी घरात संपवल जीवन
Sangli : सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा (walva) येथील एका युवकाने (youth) रहात्या घरात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली असे नमूद केले हाेते. पाेलिस (police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)
हा युवक फळ विक्रेता असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने रहात्या घरात आत्महत्या केली. बाराबिगा वसाहतीत आज (मंगळवार) सकाळी ही घटना उघडकीस आली.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश सचिन फाळके तथा मालेवाडीकर (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
योगेश याने आत्महत्येपुर्वी स्वतःच्या मोबाईलवर मध्यरात्री दोनच्या सुमारास भावपूर्ण श्रद्धांजलीसह नोटांच्या बंडलाचे फोटो डी.पी.वर सेव्ह केले होते. त्याच्या काही मित्रांनी तो डी.पी. पाहिल्यावर सकाळी त्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर योगेशच्या आत्महत्येचे प्रकरण समाेर आले.