‘मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही आणि भाऊ… निराशा मांडली अन् मामाच्या घरात अखेरचा क्ष्वास घेतला
यावल : किनगाव (ता. यावल) येथील तरूणाने ठाणे (मुंबई) येथील मामाच्या घरात गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गणेश अनिल निंबायत (वय २२) असे तरूणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइड नोट (Suicide Note) लिहली होती. (Jalgaon News Suicide Case)
किनगाव बु. (ता. यावल) येथील रहिवासी हा तरुण ठाणे (मुंबई) येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता. येथे तो मामाच्या घरी राहत होता. दरम्यान गणेशने बुधवारी पहाटेच्या सुमारास मामाच्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये मांडली निराशा
तत्पूर्वी चिठ्ठी लिहित मी एक जवाबदार मुलगा होवू शकलो नाही, मी एक जवाबदार भाऊ होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा स्पष्ट केली आहे. तरुणाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. त्याचा मृतदेह बुधवारी रात्री किनगावात आणून अंतसंस्कार करण्यात आले.