‘मी तुझी आई आहे गं, मला मारशील? आईकडुन जीवाची भीक पण १९ वर्षाच्या मुलीने संपवलचं, कारण ऐवढचं कि आईना…

Daughter Killed Mother: आई- मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. प्रियकरासाठी आपल्याच जन्मदात्या आईचा निर्घृण खून एका मुलीने केला आहे. मुलीने आईच्या डोक्यात लोखंडाच्या रॉडने १७ वार केले आहेत. अवघे १९ वर्ष वय असलेल्या या मुलीचे कृत्य पाहून कुटुंबातील इतर सदस्यही हादरले आहेत. गुजरातच्या जुनागढमध्ये हे हत्याकांड घडले आहे. २८ मे रोजी ही घटना घडली आहे.

जूनागढमधील इवनगर गावात ही भयंकर घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने रात्री आईला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या त्यानंतर तिची आई गाढ झोपली होती. आई गाढ झोपेत आहे हे पाहून मुलीने तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला घरी बोलवले होते. प्रेयसीचा फोन येताच तोदेखील तातडीने घरी आला होता.

घरातील इतर सदस्य बाहेर गेल्यानंतर तिने त्याला घरी बोलावले होते.बॉयफ्रेंड भेटायला घरी येणार म्हणून तरुणीने घरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरादेखील बंद केले होते. आईला झोपेच्या गोळ्यादेऊन गाढ झोपवले. आई गाढ झोपेत असेल असा समज करुन तिने त्याला फोन केला. मात्र, तरुणीचा हा प्लान फसला.

मुलगी बॉयफ्रेंडसोबत असतानाच आईला जाग आली. झोपेतून जागी होताच तिने मुलीला मुलासोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि तिला धक्काच बसला. आईला कळताच मुलीचा प्रियकर घरातून निघून गेला. तर, महिलेने मुलीला या प्रकरणी जाब विचारला. आईला रागात पाहताच घाबरलेल्या मुलीने आईवर वार केले.

आरोपी मुलीने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटलं आहे की, आईने घरातील इतर सदस्यांना रात्री घडलेला प्रसंग सांगेल, अशी भिती तिला होती. त्यानंतर घरातले मला खूप ओरडतील. म्हणून मी आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत तिची हत्या केली. मुलीने आईवर १७ वार करत तिचा निर्घृण खून केला.

पोलिसांना दुसऱ्या दिवशी हत्येबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा घरात मयत महिलेसोबत फक्त तिचे मुलं होते, अशी माहिती मिळाली. त्याचबरोबर घरातील सीसीटीव्हीदेखील बंद होता. कोणीतरी घरात घुसून महिलेची हत्या करेल, अशी कोणती शक्यताही नव्हती. अशातच पोलिसांना मुलीवर संशय निर्माण झाला.पोलिसांना मयत महिलेची मोठी मुलगी मिनाक्षीवर संशय होता. त्यांने तिची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. ती देत असलेली उडवाउडवीची उत्तरे ऐकून पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर पोलिसांनी पूर्ण दिवस केलेल्या चौकशीनंतर अखेर मिनाक्षीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी मीनाक्षीवर गुन्हा नोंद करुन तिला अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *