‘मी तुझ्यासाठी काहीही करीन’,मुंबईच्या कोट्याधीशाचा बायकोला प्रेमात ओढलं अन् अखेर महिलेचे डोळे….
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण मुंबईत समोर आलेले असून अब्जाधीश असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची आरोपीने तिची फसवणूक केलेली आहे. आरोपीने तिच्यासोबत माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि याचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून भोपाळ ते मुंबई दरम्यान तीन कोटी रुपये उकळले.
त्यानंतर फायनल सेटलमेंटच्या नावाखाली आणखी दोन कोटी रुपयांची तिच्याकडे मागणी केली मात्र तिने पोलिसात धाव घेतली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या सोबत एका महिलेवर देखील गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची भोपाळ येथील रहिवासी असून तिचे वय 38 वर्षे असून सध्या मुंबईत राहते. सध्या ती जोगेश्वरी येथील एका मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असून तिचे पती हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या एका रिफायनरी उद्योग समूहाचे प्रमुख आहे. 2021 मध्ये कामानिमित्त महिला भोपाळ इथे गेलेले असताना तिची धर्मेंद्र मिश्रा नावाच्या व्यक्ती सोबत ओळख झालेली होती
धर्मेंद्र मिश्रा हा त्याच्या पत्नीसोबत पीडित महिलेच्या घरी ये जा करायचा त्यानंतर एके दिवशी त्याने या पिडीत महिलेला लग्नाची मागणी घातली मात्र महिलेने नकार दिला त्यानंतर त्याने तिची माफी मागितली आणि संवाद पुन्हा सुरू ठेवण्याच्या बहाण्याने एके दिवशी तिला कोल्ड्रिंकमधून औषध दिले. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि याप्रकरणी कुणाला सांगशील तर जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली म्हणून महिला शांत बसली.
मे 2021 मध्ये पीडित महिला ही मुंबईला आलेली असताना आरोपीने पुन्हा तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपल्या परिवाराची बदनामी नको म्हणून पीडित महिलेने त्याला पैसे देण्यास सुरू केले आणि वेळोवेळी असे करत त्याने आतापर्यंत तीन कोटी रुपये उकळलेले आहेत सोबतच महिलेवर मुंबई भोपाळ या ठिकाणी अनेक वेळा लॉजवर घेऊन जात तसेच महिलेच्या घरी अत्याचार देखील केलेले आहेत.
पैसे उकळून त्याचे समाधान झालेले नसल्याने अखेर त्याने तिचा गळा दाबून मारण्याचा देखील प्रयत्न केला असे देखील पीडित महिलेने म्हटलेले आहे. पोलिसांनी या प्रकरणात धर्मेंद्र मिश्रा याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.