‘मी लवकरचं येते’,शिक्षिका पतीला फोनवर म्हणाली अन् १५ मिनीटात शरीराचे झाले असंख्य तुकडे

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बुधवारी संध्याकाळी एका शिक्षिकेला ट्रकनं धडक दिली. संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की शिक्षिकेच्या मृतदेहाचे तुकडे झाले. पोलिसांनी ते एका गोणीत जमा केले. गलतागेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. सूरजपोल अन्न मंडईजवळ ही घटना घडली.

शनीम सक्सेना (४४) असं शिक्षिकेचं नाव होतं. त्या आमेर कुंडा येथे वास्तव्यास होत्या. महेश्वरी पब्लिक शाळेत त्या शिक्षिका होत्या. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून फरार झाला. ‘संध्याकाळी ४ वाजता शनीम स्कूटीवरून घरी जात होत्या. त्यावेळी दिल्ली रोडवर त्यांना मागून एका ट्रकनं धडक दिली. आसपासच्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर ट्रक काही अंतरावर थांबला. त्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला. शनीम यांचं घर शाळेपासून १५ किलोमीटरवर होतं. त्यांच्या घरापासून १० किलोमीटर दूरवर अपघात झाला,’ अशी माहिती गलतागेट पोलीस ठाण्याचे सहायक वरिष्ठ निरीक्षक नेकीचंद यांनी दिली.

अपघाताच्या दोन तासांपूर्वी शनीम यांचा पती पंकज माथूर यांच्याशी संवाद झाला होता. शनीम यांनी पंकज यांना फोन करून आपण साडे पाचपर्यंत घरी पोहोचू, असं सांगितलं होतं. मात्र त्याआधीच पंकज यांना पोलिसांचा फोन आला. तुमची पत्नी आता या जगात नाही, असं पोलिसांनी पंकज यांना सांगितलं. ते ऐकताच त्यांच्या पायाखालाची जमीन सरकली.

दिल्ली रोडवर जिथे अपघात झाला, तिथल्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचं अपघाताचा साक्षीदार असलेल्या मुकेश सैनींनी सांगितलं. रस्त्याची चाळण झाल्यानं इथे सातत्यानं अपघात होत असतात. यासाठी अनेकदा पालिकेला पत्र लिहिण्यात आली. मात्र तरीही कोणतीही सुधारणा न झाल्याचं सैनी म्हणाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शिक्षिकेचा तोल गेला. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रकनं तिला धडक झाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *