मुंबईच्या चहावाल्याला राजस्थानच्या MBBS डाॅक्टरने केलं प्रपोज, तो पिगाळला अन् पुढं धक्कादायक निर्णय घेतला

मुंबई : सामान्यपणे लग्न म्हटलं की आपल्या तोलामोलाचा जोडीदार निवडला जातो.म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदाराचं आपल्या इतकं शिक्षण असावं,आपण जितकं कमावतो तितकचं त्यानेही कमावयाला हवं,अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.त्यात ती महिला असेल तर तिला आपला पती आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पैशांवाला हवा असतो.

असं असताना राजस्थानातील एक असं कपल चर्चेत आलं आहे,ज्याने प्रेम असेल तर या कशाचीच गरज नसती,प्रेमासमोर हे सर्वकाही क्षुल्लक आहे हे दाखवुन दिलं आहे.एका mbbs डॉक्टर महिलेने चक्क एका चहावाल्याशी लग्न केलं आहे.डॉक्टर योगिता आणि चहावाला शाहरुख.राजस्थानातील दीपालपुरमध्ये राहणारं हे कपल.दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते लग्न बंधनातही अडकले.

डॉक्टर योगिता ज्या रुग्णालयात डॉक्टर म्हणुन काम करत होती,तिथं शाहरुख चहावाल्याचं आणि साफसफाईचं काम करायचा.शाहरुख हा मुळचा मुंबईच्या नांदी परिसरात राहणारा आहे.काही वर्षापुर्वी कामानिमीत्त तो राजस्थानमध्ये आला होता अन् इथेचं स्थायिक झाला.

डॉ. योगिताने एकदा शाहरुखचा फोन नंबर मागितला आणि दोघांमध्ये बोलणं सुरु झालं.तुम्हाला आश्चर्य वाटेल पण MBBS सारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या डाॅक्टरने शाहरुखला प्रपोज केलं.

एक दिवस शाहरुखला तिने आपल्या रूममध्ये बोलावलं आपलं प्रेम त्याच्यापुढं व्यक्त केलं.डॉक्टर असलेल्या योगिताने प्रपोज केल्याने शाहरुखलाही धक्का बसला.त्याला तापही आला होता.पण त्यालाही ती आवडत होती.त्यामुळे अखेर त्या दोघांनी विवाह केला.

आता डॉक्टर आणि चहावाल्याचं लग्न हे अनेकांच्या पचनी न पडणारं होतं.त्यामुळे लग्नानंतर योगिताला रुग्णालयातील नोकरी सोडावी लागली,कारण त्यांना समाजाकडुन खुप ऐकावं लागायचं.आता ते स्वतःचं क्लिनिक खोलण्याचं ठरवलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *