मुंबईत रेल्वे स्थानकातं विकृत तरुणाचं महिलांसमोर हस्तमैथुन, कसलीचं लाज नाही; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई मुंबईतल्या परळ रेल्वे स्थानकामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विकृत तरुणाने प्लॅटफॉर्मवरच हस्तमैथुन करायला सुरुवात केली. तेही महिलांसमोर. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणाची तक्रार एका महिलेने केलीय. सदरील महिलेने त्या तरुणाचा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुंबई पोलिसांना टॅग करत महिलेने म्हटलंय की, काल कामावरुन परतत असतांना परळ स्थानकात एक व्यक्ती हस्तमैथुन करत होता. त्यानंतर त्याने पुढची लोकल पकडून तिथून पोबारा केला.सदरील महिलेने पुढे म्हटलंय की, असं वर्तन सामाजिक नीतिमत्तेचा भंग करणारं आहे. अशा लोकांकडून लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना घडण्याचा धोका संभवू शकतो, त्यामुळे सदरील विकृतावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.

धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने या प्रकरणी कुठलीही कारवाई केलेली नाही. सदरील महिलेने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तिच्या ट्विटला आणखी एका युजरने पुष्टी दिलीय. ‘हा माणूस परळ रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांकडे पाहून हस्तमैथून करताना दिसला. हा व्हीडिओ माझ्या एका मित्राने शूट केलाय असं त्याने म्हटलंय.

यासंदर्भात आरपीएफने ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय. सदरील विकृत तरुणाचा तपास केला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे फलाटावरील लोकांना याबाबत चौकशी केली. परंतु कुठल्याच प्रकारची माहिती मिळालेली नाही. असं ट्विट केलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *