मुलांसह पायीचं घराबाहेर निघाली अन् तिघांची एक्सप्रेससमोर उडी;काळीज पिळवटुन टाकणार कारण
जयपूर (राजस्थान)- येथील प्रसिद्ध बिल्डरच्या पत्नीने दोन मुलांसह सकाळी 11 वाजता जोधपूर-इंदूर इंटरसिटी एक्सप्रेससमोर उडी मारुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिघांचे अवयव गोळा करुन हॉस्पिटलमध्ये पाठवले. पतीशी झालेल्या भांडणातून तिने हे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. आत्महत्या करण्यासाठी जाताना तिने नवऱ्याने घेऊन दिलेली कारही नेली नव्हती.
आदल्या रात्री झाले होते कडाक्याचे भांडण
– बिल्डरच्या पत्नीचे नाव अनुबाला लाखलान (वय 28) असे आहे. मुलिचे नाव इशिता (वय 8) तर मुलाचे नाव जीतेश (वय 5) असे आहे. अनुबालाच्या पतीचे नाव शैलेंद्र लाखलान असे आहे. आदल्या रात्री शैलेंद्र आणि सासूसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. पोलिसांना घटनास्थळी अनुबालाची पर्स सापडली आहे. त्यात शैलेंद्रचे व्हिजिटिंग कार्ड सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बोलवून घेतले.
मुलांना ट्युशनला सोडण्यासाठी निघाली होती घरुन
– शैलेंद्र हा लाखलान अॅंड कुरेशी कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन हवासिंह यांचा मुलगा आहे.हवासिंह, शैलेंद्र, अनुबाला, दोन मुले, दीर आणि त्याची पत्नी असा परिवार होता.दररोज प्रमाणे सकाळी 9 वाजता मुलांना ट्युशनला सोडायला ती घरुन निघाली होती. पण ती वेळेवर घरी आली नाही.
तिची कारही घरीच होती. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला.त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. ती दोन्ही मुलांसह पायीच घराबाहेर पडली होती. त्यांनी घराच्या आजूबाजूला शोध सुरु केला. तेवढ्यात पोलिसांचाच फोन आला.