मुलीच्या बाॅयफ्रेंडसोबत शिक्षिकेने ३०० वेळा शारीरीक संबंध ठेवले अन् अखेर सहनशिलता संपल्याने…

Crime News : महिला शिक्षकांनी आपल्या विद्यार्थांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असता. त्यातील काही घटना तर हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका 45 वर्षीय शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. घटनेवेळी पीडित विद्यार्थी 16 वर्षांचा होता. तो आरोपी शिक्षिकेच्या मुलीसोबत हाय स्कूलमध्ये शिकत होता.

दोघांमध्ये चांगली मैत्री होती. विद्यार्थ्याचं शिक्षिकेच्या घरी येणं-जाणंही होतं. यादरम्यान शिक्षिकेने विद्यार्थ्याचं पाच वर्ष लैंगिक शोषण केलं.ही घटना अमेरिकेच्या ओल्काहोमामधील आहे. द मिररनुसार, 45 वर्षीय जेनिफर हॉकिन्सवर एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. हा विद्यार्थी तिच्या मुलीचा एक्स-बॉयफ्रेंड होता. आता तो 21 वर्षांचा झाला आहे.

जेनिफर जेव्हा एका ज्यूनिअर हायस्कूलमध्ये शिक्षिका होती, तेव्हा तिने या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले होते.पोलिसांनी नंतर धक्कादायक खुलासा केला की, जेनिफरने विद्यार्थ्यासोबत साधारण 300 वेळ शारीरिक संबंध ठेवले होते. ती नेहमीच त्याला शाळेतून दिवसा बाहेर घेऊन जात होती. ती त्याला कंट्रोलमध्ये ठेवत होती. सध्या तिला या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर रेप, शोषण आणि अत्याचारसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

जेनिफर विरोधात कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफर चालाख आणि कंट्रोलमध्ये ठेवणारी महिला आहे. तिने त्याच्यावर इतरांसोबत बोलण्यावर बंदी घातली होती.

स्वत: पीडित विद्यार्थ्याने जेनिफर विरोधात रेपचा आरोप केला आहे. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये तपास सुरू केला. विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफरने पहिल्यांदा त्याला 2017 मध्ये शारीरिक संबंधासाठी भाग पाडलं होतं. त्यावेळी तो तिच्या मुलीला डेट करत होता.

विद्यार्थ्याने दावा केला की, जेनिफरने त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 2017 पासून ते 2022 दरम्यान 300 पेक्षा जास्त वेळा लैंगिक शोषण करण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेनिफरला शाळेतून काढण्यात आलं. सध्या कोर्टात केस सुरू आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *