मुलीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्यावर चिकनही शिजवलं; म्हणते बाबासाहेबांनी मनस्मृती…

दिल्ली: सोशल मिडीयावर मनुस्मृती जाळणाऱ्या एका तरुणीचा video चांगलाच व्हायरल झाला आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगी मनस्मृती जाळत असुन नंतर त्याच आगीवर सिगारेट पेटवताना दिसतेय.नंतर चुलीत घातल्यानंतर त्यावर मटन शिजवताना दिसत आहे.या मुलीचं नाव प्रिया दास असुन,ती बिहारच्या शेखपुरा येथील राहणारी आहे.प्रिया दास हि राष्ट्रीय जनता दलाच्या महिलास सेलमध्ये कार्यरत आहे.ती 27 वर्षांची असुन video व्हायरल झाल्यानंतर आपण नेमकं असं का केलं? याबाबत खुलासा तिना केला आहे.

मनुस्मृतीमध्ये जर स्त्रिया मद्यपान करत असतील तर त्यांना अनेक प्रकारे शिक्षा दिली जाऊ शकते.तसंच संबंधित व्यक्तीला शिक्षा देण्याआधी त्यांची जात काय आहे याची माहिती घेतली पाहिजे असा थेट उल्लेख मनुस्मृतीत असल्याचं प्रिया दासने व्हिडीओत सांगितलयं.तसंच आपण हि मनुस्मृती मी पाचशे रुपयांत खरेदी केली असल्याची माहिती तिने दिली.

प्रिया दासने टाकलेला केलेला मनुस्मृती जाळतानाचा video ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.यानंतर अनेकांनी त्यावर करुन अशाप्रकारे मनुस्मृती जाळणं चुकीचं असल्याचं सांगितलं आहे.तसंच नेटकर्यांनी तिने धुम्रपान करण्याचा आणि चिकन खाण्याचाही विरोध केला आहे.पण प्रियाने एका न्युज चॅनेलशी बोलतांना सांगितले कि,मला दारु पिण्याची आणि चिकन खाण्याची सवय नसल्याचा दावा केला आहे.मी फक्त विरोध दर्शवण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा तिने केलाय.

“मनुस्मृती जाळणं हि एक क्रिया असुन घटना आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाळण्यासाठी पहिली वीट रचली होती.हे कृत्य करण्यामागे कोणत्याही व्यक्तीला विरोध करण्याचा हेतु नाही.त्या उलट चुकीच्या मानसिकतेला विरोध करणं हाच माझा हेतु असल्याचं,”प्रियाने यावेळी स्पष्ट केलयं.या अशा पुस्तकांमधुन कोणालाही कोणतंही ज्ञान मिळत नाही.याउलट त्यातुन भेदभाव आणि लोकां-लोकांत फूट पाडण्याचं काम होत आहे.अशा कुठल्याही पुस्तकाचा विरोध प्रत्येकानी केला पाहिजे असंही तिने यावेळी सांगितलं आहे.

“या पुस्तकात महिलां आणि व्यक्तीबद्दल अनेक अयोग्य गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.या पुस्तकाचं प्रत्येक पान हे जाळलं पाहिजे आणि दलितांनी तर पुढे येऊन या पुस्तकाचा विरोध केला पाहिजे.देशात जे काही चुकीचं सुरु आहे त्यामागे मनुस्मृतीच आहे.मग स्त्रियांशी संबंधित गोष्टी असो किंवा लग्नाशी संबंधित असोत.बाबासाहेब आंबेडकरांनीही मनुस्मृती जाळली होती,’असं प्रिया दासने यावेळी म्हटलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *