मुलीला बाथरुममध्ये कोंडल, बायकोच्या पोटात कात्री खुपसुन संपवल; रायगडमध्ये हत्येमागचं मोठ्ठं कारण उघडं

रायगड : रायगड जिल्ह्यात ऐवढ्यात महिला हत्याकांडांचे अनेक प्रकार वाढताना दिसत आहेत.कर्जत तालुक्यात हळवली येथे एका पत्नीची अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली.या खळबळजनक व संतापजनक घटनेने अवघा कर्जत तालुका हादरला आहे.संशयित आरोपी पती संजय उर्फ बंटी भालेराव यानेच आपल्या बायकोचा खुन केल्याचा आरोप आहे.

कर्जत कल्याण राज्यमार्गाच्या लगत असलेल्या सिग्नेचर डिझायर सोसायटीतील एफ वींग मधील पहिल्या मजल्यावरी खोली नंबर 206 यात मोठा रक्तरंजित हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार घडला आहे.संजय भालेराव उर्फ बंटी व त्याची बायको पुजा हे आपल्या ३ मुली व एका मुलासह या संकुलात भाड्याने राहत होते.

आरोपी संजय हा पनवेल रेल्वे स्थानकात व्यवसाय करत होता.संजय हा आपल्या बायकोवर कायम संशय घेत होता.तिचे कुठल्यातरी तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजयला होता.याच संशयावरुन पूजा आणि संजयत यांच्यात वारंवार भांडण होत असत.अखेर या सगळ्या भांडणाला कंटाळुन पूजाने कर्जत पोलीस ठाण्यात २ मार्च रोजी संजयच्या विरोधात तक्रार दाखल केली.पुजा आपल्या मोठ्या मुलीला संजयच्या घरी ठेवुन इतर ३ मुलांसह वांगणी येथे आपल्या माहेरी निघुन गेली होती.

दरम्यान,मोठ्या लेकीनेही पूजाला फोन करून मलाही मामाच्या घरी घेऊन जा,अशी विनंती करत संजयच्या हळवली येथील घरी बोलावले.पूजा हळवली येथे पोहचल्यावर पतीसोबत पुन्हा वादावाद झाले.याचवेळी संजयने आपल्या मोठ्या मुलीला बाथरूममध्ये कोंढुन घेतले,तर पूजाला बेडरूममध्ये नेऊन तिच्या पोटावरती धारदार कात्रीने सपासप वार केले.त्यानंतर धारदार कात्री पोटात खुपसुन त्याने जवळ असलेली शिलाईची मशीनच पूजाच्या डोक्यात घातली.तिच्या पाठीवरही कात्रीने वार केले व अत्यंत निर्दयीपणे पूजाची हत्या केली.

त्यानंतर पूजा हिची आई तिथे पोहचली.आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहुन आईच्या पायाखालची जमीनच सरकली.यावेळी सासुला धक्का देत संजय घटनास्थळावरून पसार झाला.या सगळ्या घटनेची माहिती कळताचं कर्जत पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.मात्र पळुन गेलेला खुनी संजय हा काही तासातचं कर्जत ठाण्यात हजर झाला व त्यानेचं पत्नी पूजाची हत्या केल्याची कबुली दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *