मुलीला बिस्कीट खाऊ घातले, मग तिला कडकडुन मिठी मारत तलावात उडी, उपस्थितांना रडु आवरणा

बंगळुरूमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बापानेच पोटच्या दोन वर्षीय चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आहे. तर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र, तो त्यातून वाचला. अखेर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

बंगळुरू मधील एका तंत्रज्ञाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या केली आहे. मुलीला खाऊ घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याने मुलीची हत्या केल्याची कबूली त्या निर्दयी बापाने पोलिसांना दिली आहे. मुलीचा जीव घेतल्यानंतर त्याने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो यात वाचला.

ही घटना 15 तारखेची आहे. कोलार येथील केनदट्टी गावातील तलावात 16 तारखे रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या तलावाच्या काठावर निळ्या रंगाची कारही पोलिसांना सापडली आहे. हे पाहून गावातील लोकांनी कोलार पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडिलांचा शोध सुरू केला, त्यानंतर आरोपी वडिलांना 16 तारखेला बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण आता उघडकिस आले आहेत.

आरोपी वडिल मुलीसह बेपत्ता होता
45 वर्षीय राहुल परमार असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा गुजरातचा असून दोन वर्षांपूर्वी पत्नी भव्यासोबत बेंगळुरूला राहण्यासाठी आला होता. 15 तारखेपासुन तो आपल्या मुलीसह बेपत्ता झाला. ज्याची तक्रार त्याची पत्नी भव्याने पोलिस ठाण्यात केली होती.

मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने आरोपी घरातून निघून गेला
मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे राहुल याने पोलिसांना सांगितला. त्याला आत्महत्येची इच्छा होती, पण मुलीसमोर असल्याने तो निर्णय घेऊ शकला नाही. तो दिवसभर बंगळुरू आणि कोलारमध्ये फिरला. संद्याकाळी तलावाजवळ गाडी थांबवून तो बराच वेळ काय करावे याचा विचार करत राहीला. त्याने घरी परतण्याचा विचारही केला. परंतू आपण घरी परतलो तर सावकारांकडून आपल्याला त्रास होईल, अशी भीती त्याला लागून होती.

मुलीला जोराची मिठी मारली आणि तिचा मृत्यू झाला
तलावाजवळील दुकानातून मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे खरेदी केली. पण मुलीला दुपारपासून भूक लागली होती म्हणून ती रडतच राहिली. मुलीला दुसरे काही खायला घालण्यासाठी राहुलकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने मुलीसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आधी तो बराच वेळ मुलीसोबत विविध गेम खेळत राहीला.

मग बराच वेळ तिला मिठीत घेत राहीला. अखेर त्याने जोराची मिठी मारल्याने दोन वर्षांची चिमुरडी गुदमरली आणि त्याने तिच्यासह तलावात उडी मारली. मात्र तो वाचला. यानंतर त्याने ट्रेनमधून गळफास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तो बंगळुरू रेल्वे स्थानकावर पोहोचला, जिथे पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गेल्या 6 महिन्यांपासून बेरोजगार होता आणि त्याच्या बिटकॉइन व्यवसायातही त्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्या बंगळुरूतील घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी लिहिली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तो सतत पोलीस ठाण्यात जात असे.

पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राहुलनेच घरातून दागिने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांनी पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते, मात्र त्यापूर्वीच त्याने मुलीची हत्या केली. चोरीची खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी कारवाईच्या भीतीने तिने मुलीचा जीव घेतल्याचा पोलिसांचा समज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *