मृत्यूनंतरही आई आली लग्नाच्या मांडवात, मुलाला आणि सुनेला दिला आशीर्वाद

मृत्यूनंतरही आई आपल्या लेकाच्या लग्न सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी आली.हे ऐकुन तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना.पण हे खरयं.पण प्रत्यक्ष देहरुपानं नव्हे.अवयवदानाच्या रुपानं ती आई ज्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपण केलं त्याच्या रुपानं अवतरली.मुलाला आशीर्वाद दिला.या भावनिक दृष्याने अवघा मांडव गलबलुन गेला.

सोलापुरातील पूर्व भागात गुण्यागोविंदानं नांदणारं चंद्रकांत निली हे हसतं खेळतं एक कुटुंब.अचानक या सुखी संसाराला दृष्ट लागली शारदा नीली यांनी जानेवारी २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला.वैद्यकीय तज्ञांनी उपचार केले मात्र पदरी निराशा आली.त्यावेळी घरच्यांनी डॉ.संदीप होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा निली यांचं अवयव दान करण्यात आलं.

शारदा निली यांच्या किडनीचं डायलिसिस पेशंट असणारे बार्शीचे राहुल जयस्वाल यांना प्रत्यारोपण झालं होतं.यामुळे त्यांना नवजीवन मिळालं.अवयवदानाच्या रुपानं का होईना आपली पत्नी या जगात आहे अशी भावना बाळगुन चंद्रकांत विडप कुटुंबीय त्यांच्या दिनचर्येत रमले.

१० महिन्यानंतर २८ नोव्हेंबरला चंद्रशेखर निली आणि स्व. शारदा निली यांचा मुलगा नितीन यांचा विवाहचा योग जुळून आला.निली कुटुंबीयांना किडनी दिलेल्या तरुणाची माहिती होती.या विवाह सोहळ्याला अवयव रुपानं संबंधीत रुग्णानं यावं,अशी निली कुटुंबीयांची इच्छा होती.त्यानुसार डॉ. संदीप होळकर यांनी जयस्वाल कुटुंबीयांना लग्नाचं निमंत्रण दिलं.विनंतीनुसार राहुल जयस्वाल हे आपल्या आई-वडीलांसह या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले.

आई मानून केले चरणस्पर्श
नवदाम्पत्य नितीन आणि भावना या दोघांनी अवयवदान प्रत्यारोपन झालेल्या राहुल जयस्वाल यांना आई समजुन त्यांचा आशिर्वाद घेतला.जणु आपली आईच लग्न मंडपात आशीर्वाद देण्यासाठी आली आहे,या समर्पित भावनेने त्यांनी चरणस्पर्श केला.या प्रसंगाने सर्व उपस्थित लोक भारावले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *