‘मोठे बाबा’ म्हणणारी शेजारच्या तरुणीना वृध्दाला बेडरुममध्ये बोलावलं, गोळ्या देऊन हवस मिटवली अन् १० दिवसांनी खरा प्लॅन समोर आला

गुवाहाटी: आसामच्या जोरहाट जिल्ह्यात ७२ वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. पॉर्न साईटवर स्वत:चा व्हिडीओ पाहिल्यानंतर वृद्धानं टोकाचं पाऊल उचललं. या व्हिडीओमध्ये वृद्ध एका महाविद्यालयीन तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवताना दिसत होता. मृत व्यक्ती अविवाहित होता. त्याच्या आत्महत्येनंतर गावातील महिलांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन केलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटना जोरहाट जिल्ह्यातील ढेकेलिया गावातील आहे. आरोपीचं नाव दर्शना भराली असं आहे. ती पीडित वृद्धाला ‘मोठे बाबा’ म्हणायची. तिनं ७२ वर्षीय वृद्धाला आपल्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी ती घरात एकटीच होती. आरोपी तरुणीनं वृद्धाला आपल्या बोलण्यात फसवलं आणि त्याच्याशी शरीरसंबंध ठेवून गुपचूपपणे त्याचं चित्रीकरण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

दर्शनानं वृद्धाला वेदनाशामक गोळ्यांऐवजी नशेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे त्याला त्यावेळी घडलेल्या घटनांबद्दल काहीच समजलं नाही, असा ग्रामस्थांचा दावा आहे. आत्महत्या करण्याआधी वृद्धानं ग्रामस्थांपुढे त्याची व्यथा मांडली होती. दर्शना आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं वृद्धानं ग्रामस्थांना सांगितलं होतं. दर्शनानं शरीरसंबंधांचा व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड केला. तो पाहून वृद्धानं आत्महत्या केली. पोलिसांना वृद्धाच्या मोबाईलमध्ये त्याचा अश्लिल व्हिडीओ सापडला आहे.

वृद्धाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी दर्शनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलन केलं. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तपास सुरू केला आहे. आरोपी तरुणीचे आणखी काही जणांसोबतच्या शरीरसंबंधांचे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपी महाविद्यालयात शिकते. तिच्यासोबत शिकत असलेल्या तरुणासोबतही तिनं अश्लिल व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर संबंधित तरुणावर व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला. त्यावर दर्शनानंच आपल्याला फसवल्याचा दावा तरुणानं केला. दर्शना अभ्यासात अतिशय हुशार आहे. कोणीतरी तिचा वापर प्यादासारखा करत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *