मोबाईल फोनमुळे वडील रागावले, तो 17 व्या मजल्यावरून उडी मारणार, इतक्यात हात सटकला, मग जे झाले…

सिंगापूर : मोबाईलचं मोठ्यांसह लहानमुलांनाही वेड लावले आहे, लोक जेव्हा पहावं तेव्हा मोबाईलच्या स्क्रिनला नाक चिकटवून बसलेले असतात, त्यामुळे शाळकरी मुलांना अभ्यासावरून नेहमी पालक ओरडताना दिसत असतात, त्यामुळे मुले देखील जिद्दी झाली असून आपल्या इच्छा आणि जिद्द पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जात असतात.

अशाच एका घडनेत मुलगा इमारतीच्या सतराव्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली उतरला आणि त्याने उडी मारण्याची धमकी दिली आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच खाली कोसळला..पण पुढे काय झाले ते पाहा..एक धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून तो सिंगापूर येथील आहे. एका घटनेत वडीलांनी मोबाईलमुळे मुलाला रागावल्याने त्याने खिडकीतून बाहेर जात उडी मारण्याची धमकी दिली, त्यामुळे या मुलाचा राग आला आणि त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

तो बापाला आधी धमकी देत असतो, स्टंट करीत असतो, आई-वडीलांना तो पुन्हा मोबाईलवरून ओरडाल का ? असे धमकावत असतानाच इमारतीच्या गॅलरीतून हात सरकतो आणि तो सतराव्या मजल्यावरून थेट खालीच कोसळतो. परंतू त्याचे आई-वडील सावधान असल्याने ते लागलीच फायर ब्रिगेटला बोलावून घेतल्याने त्याला वाचविले जाते. कसे ते पाहा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *