मोबाईल बंद केल्यावर तरी ‘ लफडं ‘ तुटेल , बाऊन्सरचा लळा तोडायला गेली अन् सुनेने सासु-सासर्याचे..
देशात विवाहबाह्य संबंधातून क्रूरतेच्या मर्यादा पार करणारी एक घटना नवी दिल्ली येथे समोर आलेली असून सासू-सासर्यांची हत्या प्रियकराच्या मदतीने घडून आणणाऱ्या एका सुनेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मोनिका वर्मा असे 29 वर्षीय महिलेचे नाव असून तिचा प्रियकर आशिष ( वय 29 ) याने तिला प्रकरणात मदत केल्याचे समोर आलेले आहे.
मोनिका हिच्या प्रेमसंबंधाबद्दल सासू-सासर्यांना माहिती समजली होती म्हणून त्यांनी तिच्यावर अनेक निर्बंध लादलेले होते त्यामध्ये स्मार्टफोन मोबाईल न वापरणे, घराबाहेर न पडणे असे प्रकार सासू-सासऱ्यांकडून सुरू झाले म्हणून अखेर तिने हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे. तिला स्मार्टफोन ऐवजी साधा फोन देण्यात आला आणि त्यांच्यातील संपर्क तोडण्यासाठी सासू-सासरे सक्रिय होते म्हणून मोनिका हिने सासू-सासर्यांना संपवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मोनिका हिचा विवाह 2016 साली रवी नावाच्या एका व्यक्तीसोबत झालेला होता. 22 व्या वर्षी मोनिका हिचे लग्न झालेले होते. कोरोना काळात लॉकडाऊन झाला त्यावेळी मोबाईलचा वापर करतेवेळी मोनिका हिचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आशिष याच्यासोबत संपर्क आलेला होता . आशिष हा बॉडी बिल्डर होता आणि बाऊन्सर म्हणून देखील काम करायचा हळूहळू त्यांच्यात सेक्स चॅटदेखील सुरू झाले आणि त्यानंतर फेब्रुवारीनंतर त्यांनी हॉटेलमध्ये भेटण्यास देखील सुरुवात केली.
मोनिका विवाहित असून तिला एक मुलगा आहे ही माहिती आशिषच्या आईला गेल्यावर्षीच समजली होतं तरीदेखील त्यांच्यातील प्रेमसंबंध थांबत नव्हते. दरम्यानच्या काळात मोनिका हिचा पती रवी याने तिच्या मोबाईल मधील मेसेज वाचले आणि त्यामध्ये तिने आशिष याला चक्क ‘ माझ्या आयुष्यावर हे सर्वजण नियंत्रण लावू पाहत आहेत त्यामुळे मी करत असलेल्या कृत्यावर मला कसलाही पश्चाताप नाही ‘, असे देखील म्हटले होते सोबतच आपली सासू विना ही सतत आपल्यावर नजर ठेवून असते म्हणून घरात भांडणे होत आहेत असे देखील ती म्हणाली होती.
मोनिका हिच्या कुटुंबीयांनी अखेर ते घरच विकून टाकण्याचे ठरवले त्यामुळे मोनिका संतापली आणि घराचे येणारे दोन दीड ते दोन कोटी रुपये आपल्याला मिळावेत यासाठी तिने प्लॅनिंग चालू केलेली होती. सासू-सासरे आणि पती यांचा काटा काढण्याची तयारी तिने डिसेंबर 2022 पासून सुरु केली आणि 20 फेब्रुवारी २०२३ रोजी दोघे एका हॉटेलमध्ये भेटले आणि त्यानंतर त्यांनी सासू-सासर्यांच्या आणि पतीच्या हत्येचा प्लॅन केलेला होता. रात्री सर्वजण झोपल्यानंतर आशिष मोनिका हिच्या घरी आला आणि त्यानंतर त्याने रात्री दोनच्या सुमारास या सासू-सासर्यांचे खून केले.
सोमवारी सकाळी घरामध्ये दोन मृतदेह आढळलेले होते त्यावेळी संशयावरून मोनिका हिची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पॉलिसी खाक्या दाखवल्यानंतर ती घडाघडा बोलू लागली. तिच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड सापडलेले असून त्यातील एक सिमकार्ड हे खास आशिषसोबत बोलण्यासाठी होते ही देखील माहिती समोर आलेली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील आशिष हा दुचाकीवर परिसरातून रात्री निघून जाताना दिसलेला असून सासू-सासरे आणि सून यांच्यात सातत्याने भांडणे होत होती अशी देखील माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेली आहे.