मोर तडफडत होता पण त्याने एक-एक करत उपटली पिसं अन् निर्लज पोरगी हसायची….;व्हिडीओतुन

भोपाळ: मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक मुलगा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची पिसं खेचून काढताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक मुलगीदेखील आहे. वन विभागापर्यंत व्हिडीओ पोहोचला. त्यानंतर त्यांनी व्हिडीओचा तपास सुरू केला.

मोरासोबत घडलेला निदर्यीपणाचा प्रकार रिठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ‘काही दिवसांपूर्वी एका एनजीओनं त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. हळूहळू तो व्हायरल झाला,’ अशी माहिती वनाधिकारी गौरव शर्मांनी दिली. व्हायरल व्हिडीओची दखल घेण्यात आली असून व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बाईकच्या नंबर प्लेटवरुन त्याचा शोध घेण्यात आला. आरोपीचं नाव अतुल कोहान्हे असून तो कटनीच्या रिठी परिसरात वास्तव्यास आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो घरी नव्हता. पोलिसांकडून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अतुल एका मोरासोबत दिसत आहे. अतुलनं मोराला पकडून एकएक करुन त्याची पिसं खेचून काढली. त्याचं क्रौर्य पाहून सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अतुल अतिशय क्रूरपणे मोराची पिसं उपटून काढताना दिसत आहे. बॅकग्राऊंडमध्ये एक गाणं सुरू आहे. जमिनीवर सगळीकडे पिसंचपिसं पडली आहेत. तरुण पिसं काढताना कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करुन संताप व्यक्त केला आहे. आरोपी मुलाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. इन्स्टाग्रामवर रील करण्यासाठी आरोपीनं मोराची पिसं खेचून काढली. इन्स्टावर अधिक लाईक्स मिळवण्यासाठी त्यानं हा संतापजनक प्रकार केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *