….म्हणुन सख्खे भाऊ-बहिण नवरा-बायको बनुन राहत होते, तुम्हीही डोक्याला हाथ मारालं

नेपाळहुन फरार अल्पवयीन भाऊ-बहिणीला पोलिसांनी छुपरामधुन ताब्यात घेतलं.दोघेही एका कंपनीमध्ये आपली खरी ओळख लपवुन पती-पत्नी बनुन काम करत होते.

सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांच्या कुंटुबाला याबाबत समजलं.त्यानंतर त्यांना घेण्यासाठी ते छपरा येथे आले.सगळेच पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे बराच वेळ ड्रामा सुरू राहिला.बरंच समजावल्यानंतर ते दोघे घरी परत जाण्यास तयार झाले.

दोन्ही भाऊ-बहिणींना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अजब प्रकार घडला.आशिका(वय 16) आणि आयुष(वय 17) ने आधी तर आपल्या आई-वडिलांना ओळखण्यास नकार दिला.नंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला जो कि बराच वेळ चालला.बराच वेळ आई-वडील आणि मुलांची बाचाबाची झाली.तेव्हा कुठे दोघेही आपल्या आई-वडिलांसोबत जाण्यास तयार झाले.

मुलांची आई तुनका विकने सांगितलं की,एक महिन्याआधी दोघेही अचानक गायब झाले होते.त्यांचा आजुबाजुला खुप शोध घेण्यात आला.पण काही पत्ता लागला नाही.स्थानिक न्युज पोर्टलच्या मदतीने दोघांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली.छपरातील एका इसमाने दोघेही इथेच असल्याची माहिती पोलिसांना कळवली.

तुनका वीकने सांगितलं की,दोघांची माहिती मिळाल्यावर आम्ही छपरा येथे पोहोचला आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधलं.विकने पुढे सांगितलं की,दोघेही भाऊ-बहीण कौटुंबिक वादामुळे घरातुन पळुन गेले होते.पण ते छपरामध्ये कसे पोहोचले आणि त्यांना नोकरी कशी मिळाली हा मात्र चौकशीचा विषय आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *