…म्हणुन मुंबईत प्रियकराने प्रियसीला आपली थुंकी चाटायला लावली, खळबळजनक प्रकार समोर

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या मुंबईतील मिरा रोड परिसरात समोर आलेले असून गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवण्यात आल्यानंतर तरुणाचा धर्म वेगळा असल्याकारणाने तरुणीने त्याला लग्नास नकार दिला म्हणून तिच्या प्रियकराने तिची खाजगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला मारहाण देखील केली.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आपल्याला थुंकी चाटायला लावली असे पिडीतेचे म्हणणे असून काशिमीरा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.उपलब्ध माहितीनुसार, इम्तियाज चौधरी असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. इम्तियाज हा मिरा रोड परिसरात राहत असून ठाणे येथील एका तरुणींचे त्याच्यासोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

त्यातून तो तिला लग्नाची मागणी घालत होता मात्र तो इतर धर्माचा असल्या कारणाने तरुणीने त्याला लग्नास नकार दिला त्यातून त्याने तिला तिची खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . लग्न होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने चक्क थुंकून आपल्याला त्याची थुंकी चाटायला लावली असे देखील या पीडित तरुणीचे म्हणणे असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *