यवतमाळमध्ये स्वत:च्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेत महिलेची आत्महत्या, चौकशीतुन मोठ्या कारणाचा खुलासा

सावळी सदोबा (यवतमाळ) : पारवा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथील एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली.प्रीती अमोल राठोड (२४), असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरी कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.

माहेरच्या नातेवाइकांनी किंचाळी फोडत मृतदेहाला कोणालाच हात लावू दिला नाही. सासरच्या मंडळींना अगोदर अटक करा, नंतरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवा, असा नातेवाइकांचा आग्रह होता. लग्न झाल्यापासूनच सासरच्या मंडळीचा माझ्या बहिणीला मानसिक त्रास दिल्याने प्रीतीच्या भावाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नमूद केले. माझी बहीण प्रीती माहेरी आल्यावर नेहमी सासरच्या लोकांकडून त्रास असल्याचे सांगत होती, असेही नमूद केले.

पारवाचे ठाणेदार गजानन गजभारे व पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रीतीच्या सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीने बाळाच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला. मात्र, सासरच्या मंडळींनी तिचा घातपात केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे माहेरच्यांनी म्हटले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रीतीला केवळ एक वर्षाचा लहान मुलगा आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *