येशूला भेटायचंय मरेपर्यंत उपवास करा , तब्बल ‘ इतक्या ‘ लोकांनी गमावले प्राण
कुणावरही आंधळा विश्वास ठेवणे जीविताला घातक ठरू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले असून असेच एक प्रकार आफ्रिकेतील केनिया इथे समोर आलेला आहे. देवाला भेटण्याच्या इच्छेने काही व्यक्ती एका धर्म उपदेश करणाऱ्या व्यक्तीकडे पोहोचले होते मात्र हे पुन्हा आलेच नाहीत. आत्तापर्यंत तब्बल 72 मृतदेह आढळलेले असून या सर्व जणांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे.
आरोपी धर्म उपदेशक याने जर येशूला भेटायचे असेल तर मरेपर्यंत उपाशीच राहावे लागते असे आदेश दिल्याने या लोकांनी काही खाल्ले नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.पॉल मॅकेंझी ( paul mackenzie kenya ) असे या धर्मउपदेश करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून आत्तापर्यंत तब्बल 72 लोकांचे मृतदेह आढळून आलेले आहेत तर काही जणांचे मृतदेह अद्यापही सापडलेले नाही. त्याच्या या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने लोक सहभागी झालेले होते.
त्याच्या शेतामध्ये अनेक जणांच्या कबरी सापडलेल्या असून त्यामध्ये योग्यरीत्या लोकांना दफन देखील केलेले नाही हे देखील समोर आलेले आहे. 14 एप्रिल रोजी त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळाली आणि ते आरोपीच्या शेतामध्ये बांधलेल्या गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च इथे पोहोचले. तिथे पंधरा लोक उपासमारीने त्रस्त होते मात्र तरीही सर्वजण या व्यक्तीच्या आहारी गेलेले देखील त्यावेळी दिसून आले .
आरोपी आणि त्याच्या अनुयायांना प्रभू येशूला भेटण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही उपवास करा असे आदेश दिलेले होते त्यामुळे या व्यक्तींनी प्राण गमावलेले आहेत.आरोपी पॉल मॅकेंझी याच्यावर याआधी देखील अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून 2019 मध्ये आणि यावर्षी मार्चमध्ये पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे .
त्याची सुटका झाल्यानंतर देखील लोक त्याच्या दर्शनाला गर्दी करतात त्यावेळी तो पुन्हा तशाच पद्धतीने नागरिकांना मरेपर्यंत उपवास करा तर तुम्हाला प्रभुचे दर्शन होईल असा सल्ला देतो आणि नागरिक त्याचे पालन करतात. स्थानिक नेते मात्र सुदैवाने त्याच्या विरोधात असून न्यायालयाकडे त्याला सोडू नका अशी विनंती करत आहेत तर त्याचे काही अंधभक्त त्याच्या बाजूने देखील सोशल मीडियावर प्रचार करत आहेत.